कोपरगाव शहराच्या लक्ष्मीनगर भागातील अतिक्रमण नियमानुकूल करण्याला आमदार आशुतोष काळेंकडून चालना. !!


कोपरगाव शहराच्या लक्ष्मीनगर भागातील अतिक्रमण नियमानुकूल करण्याला आमदार आशुतोष काळेंकडून चालना. !!

कोपरगाव नगरपरिषद लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करावे याबाबत नगररचना, मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक सुधाकर नांगनोरे यांना निवेदन देतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव शहरातील कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. ११३ (भाग) व ११४ (भाग) मधील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर मागील अनेक वर्षापासून नागरिक वास्तव्य करीत असून हे नागरिक राहत असलेली जागा नियमानुकूल करून मिळावी याबाबतची या नागरिकांची मागणी होती. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी पाऊल उचलत या जागा नियमानुकूल करण्यासाठी नुकतीच नगररचना, मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक सुधाकर नांगनोरे यांची भेट घेवून त्यांना या जागा नियमानुकूल करण्याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक विरेन बोरावके, राजेंद्र वाघचौरे उपस्थित होते.

    दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील सर्वांसाठी घरे २०२२ योजनेअंतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी मार्गदर्शक सूचनानुसार कोपरगाव नगरपरिषदे मार्फत लक्ष्मीनगर झोपडपट्टीचे सर्व्हे नं. ११३ (भाग) व ११४ (भाग) मधील सर्वेक्षण पूर्ण करण्यात येवून झोपडपट्टी धारकांमध्ये या योजनेविषयी जनजागृती करून माहिती देण्यात आली आहे. या नागरिकांसोबत बैठक घेवून सर्व शंकांचे निरसन देखील करण्यात आले आहे. सर्वेक्षण करतांना झोपडपट्टी धारकांकडून जमा करण्यात आलेल्या अर्जांची व कागद पत्रांची नगरपरिषद संचलनालयाकडून आलेल्या परिपत्रकानुसार झोपडपट्टीधारकांची पडताळणी करण्यात आली आहे. हि झोपडपट्टी नियमानुकूल करण्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने २९ नोव्हेंबर २०१९ च्या सर्वसाधारण सभेत ठराव देखील करण्यात आला आहे.

            शासन नियमानुसार सर्व सर्व बाबींची पूर्णपणे पूर्तता करून कोपरगाव नगरपरिषदेने ५ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या सदस्य समितीच्या बैठकीत समितीचे सदस्य सचिव कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी प्रस्ताव ठेवला आहे. सदर प्रस्तावामध्ये शासन निर्णयानुसार रस्ता, खुली जागा व सुविधा भूखंडासाठी लागणाऱ्या जागेसाठी जागेसाठी प्रस्तावित आराखड्यानुसार विकास नियंत्रण नियमावली मधील अटी शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे मार्फत प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाची आपण तातडीने दखल घेवून या प्रस्तावास मंजुरी द्यावी. व लक्ष्मीनगर भागात शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांची अतिक्रमणे नियमानुकूल करून दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.


          

जाहिरात
Search
विडिओ
Recent News