जिल्हा बँक शाखा उपबाजार समिती व निमगाव वाघा विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल नाना डोंगरे यांचा सत्कार


जिल्हा बँक शाखा उपबाजार समिती व निमगाव वाघा विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल नाना डोंगरे यांचा सत्कार

वाळकी (प्रतिनिधी विजय भालसिंग) - निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य प्रसिध्दी प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल व श्री संत तुकाराम महाराज पर्यावरण संरक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जिल्हा बँक शाखा उपबाजार समिती नेप्ती (निमगाव वाघा) व विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाखा अधिकारी दिलीप गायकवाड, सोसायटीचे सचिव विजय सोनवणे, सुभाष भोसले, बाळासाहेब साठे आदी उपस्थित होते. नाना डोंगरे यांनी सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळा ठसा उमटविला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले डोंगरे यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे. त्यांचा कार्याचा गौरव सर्वत्र होत असताना गावाच्या दृष्टीने भुषणावह असल्याची भावना शाखा अधिकारी दिलीप गायकवाड यांनी व्यक्त केली. डोंगरे हे सोसायटीचे संचालक असून, त्यांना सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे कार्य दिशादर्शक आहे. त्यांच्या कार्याचा सोसायटीला अभिमान असल्याचे विजय सोनवणे यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने सामाजिक कार्य चालू असून, युवकांनी या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन सत्काराला उत्तर देताना डोंगरे यांनी केले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News