वाळकी विजय भालसिंग प्रतिनिधी
शिवसेनेचे उपनेते , तथा माजी मंत्री अनिलभैया राठोड यांचे बुधवारी पहाटे निधन झाले .त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे ठरले . पंधरा दिवसापूर्वी ठणठणीत असणारे , कोरोनाच्या महासंकट काळातही सर्वसामान्यांसाठी एखाद्या योद्धा सारखे लढणारे अनिलभैया राठोड यांच्या निधनामुळे नगर तालुक्यातील शिवसैनिक आणि नगरकरांना मोठा आघातच झाला . शिवसेना व नगरकरांसाठी अनिलभैया राठोड हे ढाण्या वाघासारखे होते . एखादा वाघ शत्रूंवर जसा डरकाळी फोडतो , तटुन पडतो ,तशाच पद्धतीने सर्वसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी व शिवसैनिकांच्या न्यायासाठी अनिलभैया राठोड हे ढाण्या वाघासारखे शेवट पर्यत लढले . एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची राज्यभर ख्याती होती .हिंदू हदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात असे . अनिल भैया राठोड काळाच्या पडद्या आड झाल्याने शिवसेनेचा ढाण्या वाघच हरपला असल्याची दु:खद प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे . सतत धगधगतं नेतृत्व , प्रचंड संघर्ष ,सर्वसामान्यांसाठी अहोरात्र लढणं ,आंदोलने किती केले याचे मोजमाप नसणे ,सडेतोड व्यक्तीमहत्व , करायचं ते मनापासून ,लढायचं तर मागे हटायचं नाही , असे विविध सर्वगुणसंपन्न असणारे नगर तालुक्यांसह नगरकराचे भैया अर्थात माजी आमदार अनिल राठोड बुधवारी अनंतात विलीन झाले . हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होवून ते शिवसेनेत सक्रीय झाले .भैयांनी १९९० मध्ये विधानसभा निवडणूकीची पहिली लढाई जिकून नगरमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकाविला . तदनंतर २५ वर्षे त्यांनी मागे पाहिलेच नाही . त्यांच्या विजयाचा रथ दौडतच होता . एक नाही तर २५ वर्ष त्यांनी मागे पाहिलेच नाही . युती सरकारच्या कारकिर्दीत त्यांनी मंत्रीपदही भूषविले होते . शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारीही त्यांनी सक्षमपणे सांभाळली .
मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून श्रद्धांजली ।
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल भैया राठोड यांना श्रद्धांजली वाहिली . अनिल भैया राठोड यांच्यावर रुग्णालयात औषधोपचार चालू असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती . बुधवारी राठोड यांच्या निधनाचे वृत्त मुख्यमंत्री ठाकरे यांना कळताच एक सच्या शिवसैनिक आम्ही हरपलो ,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली .उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राठोड यांना श्रद्धांजली वाहिली असून हा मोठा आघात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली . दरम्यान राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ,माजी मंत्री अशोक चव्हाण ,जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ,नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ,आ .निलेश लंके ,खा .सुजय विखे ,आ . अरुणकाका जगताप ,मा .खा . दिलीप गांधी , शिवसेना दक्षिण प्रमुख प्रा. शशिकांत गाडे , माजी महापौर भगवान फुलसौदर ,माजी आ.दादाभाऊ कळमकर ,शहरप्रमुख दिलीप गांधी याच्या सह अनेक मान्यवरांनी अनिलभैया राठोड यांना श्रद्धांजली वाहिली . एक योद्धा गमावला अशीही प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली