विश्व हिंदू परिषद व प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव समितीतर्फे श्री राम मंदिराच्या भूमी पूजन निमित्त रक्तदान शिबीर संपन्न


विश्व हिंदू परिषद व प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव समितीतर्फे श्री राम मंदिराच्या भूमी पूजन निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

- विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव समितीतर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजन निमित्त रक्तदान शिबीरप्रसंगी रा.स्व. संघाचे शहर सह संघचालक वाल्मिकराव कुलकर्णी,निलेश लोढा,बापू ठाणगे,विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अँड.जय भोसले,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,हरिभाऊ डोळसे,बजरंगदल जिल्हा सहसंयोजक भरत थोरात,बाली जोशी,उमेश झेंडे,महेश बेद्रे,जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.विलास मढीकर आदी. (छाया-अमोल भांबरकर)             युवकांनी रक्तदानाच्या सामाजिक कार्यातून श्रीराम सेवा केली-वाल्मिकराव कुलकर्णी

नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे.आज श्री राम मंदिराच्या भूमी पूजन हा अभूतपूर्व ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे.श्रीराम उत्सव सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा होत आहे.श्री राम मंदिराच्या भूमी पूजन या दिवसाची साक्ष म्हणून युवकांनी रक्तदानाच्या सामाजिक कार्यातून श्रीराम सेवा केली आहे.असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे शहर सह संघ चालक वाल्मिकराव कुलकर्णी यांनी केले.                                                     नालेगाव येथील जनकल्याण रक्तपेढीत विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव समिती तर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजन निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटन रा.स्व. संघाचे शहर सह संघचालक वाल्मिकराव कुलकर्णी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम,छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले.याप्रसंगी निलेश लोढा,बापू ठाणगे,विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अँड.जय भोसले,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,मठमंदिर संपर्क समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे,प्रांत धर्मप्रसार सह प्रमुख डॉ.मिलिंद मोभारकर,जिल्हा धर्मप्रसार प्रमुख अनिल देवराव,शहर सहमंत्री राजेंद्र चुंबळकर,बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष गौतम कराळे,सहसंयोजक भरत थोरात,बाली जोशी,उमेश झेंडे,महेश बेद्रे, अमोलसेठ पारख,कमलेश भंडारी,अशोक भंडारी,भैया काशीद,जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.विलास मढीकर,मुकेश साठे,प्रकाश स्मार्त आदींसह रामभक्त मोठ्या संख्येनी उपस्थित होते. या शिबिरात ३२ युवकांनी रक्तदान केले.रक्तदात्यांचा सत्कार जनकल्याण रक्तपेढीतर्फे गौरवपत्र देऊन करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद,बजरंगदल व प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.                                                                                              

जाहिरात
Search
विडिओ
Recent News