स्वर्गीय.शिवाजी पाटील निलंगेकर महाराष्ट्रातील एक गांधीवादी विचारसरणी !!


स्वर्गीय.शिवाजी पाटील निलंगेकर महाराष्ट्रातील एक गांधीवादी विचारसरणी !!

संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजी पाटील निलंगेकर  एक स्वातंत्र्य सेनानी, तसेच गांधीवादी विचारसरणी असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, स्वर्गीय शिवाजी पाटील निलंगेकर (दादासाहेब) यांचे नुकतेच पुणे येथे निधन झाले.

 हैद्राबाद मुक्तीसंग्राम आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.केवळ स्वातंत्र्यसेनानी म्हणून नव्हे तर गांधीतत्त्वज्ञानाशी समरस झालेले शिवाजी पाटील उर्फ दादासाहेब निलंगेकर यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा येथे झाला दादासाहेबांनी आज ५ ऑगष्ट रोजी पुणे येथे अखेरचा श्वास घेतला.शिक्षणात अपयश आले कि, राजकारणात धंदा सुरू करणाऱ्यापैकी दादासाहेब  नव्हते. एम.ए; एल.एल.बी.प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होऊन, अर्थार्जनासाठी नव्हे तर खऱ्या अर्थाने त्यांनी समाजकारण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात उडी घेतल्यापासून एक जबाबदार नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जायचे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असणारे दादासाहेब पाटील हे १९६२मध्ये प्रथम निलंगा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडुन आले.गांधी घराण्याशी एकनिष्ठ असल्याने महाराष्ट्राचे १० वे मुख्यमंत्री म्हणून दादासाहेबांना निवडले गेले.ता.३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ या काळात त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. हा कालखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यातील काळजीवाहु सरकारां वजा सगळ्यात छोटा कालखंड होता.

 या काळात निलंगा जिल्हा निर्मिती,औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ, महाराष्ट्र सदन, यासारखे राज्यातील विविध प्रकल्प, तसेच जिल्हा न्यायालये अशी अनंत कामे त्यांनी केली. मुख्यमंत्रीपद भुषविल्यानंतर सुशिलकमार शिंदे यांच्या मंत्रीमंडळात महसुलखाते सांभाळले. १९९०ते १९९१या काळात क्रॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद, वयाच्या ९० व्या वर्षी अखेर दि ५ ऑगस्ट पहाटे २-३० वा.मामुली हृदय विकाराला बळी पडला. महाराष्ट्रातील या स्वातंत्र्यसेनानी नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली

  धन्य ते नेते, ज्यांनी भारत घडवला.

सहकार्य - प्रभाकर अनाप.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News