तलाठी बाबु वर्षानुवर्षे एकाच जागी!! पुरंदर दौंड तालुक्यातील तलाठ्यांच्या यावर्षी बदली न झाल्यास आंदोलन करू -संतोष डुबल


तलाठी बाबु वर्षानुवर्षे एकाच जागी!!  पुरंदर दौंड तालुक्यातील तलाठ्यांच्या यावर्षी बदली न झाल्यास आंदोलन करू -संतोष डुबल

सासवड (प्रतिनिधी) राजश्री बनकर।                 

संपूर्ण राज्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, वायरमन या अधिकाऱ्यांच्या बदल्या दर तीन वर्षांनी होत असतात परंतु दौंड व पुरंदर तालुक्यातील तलाठी बाबू मात्र ऐकाच तालुक्‍यात २० ते  २१ वर्ष एवढा कालावधी पर्यंत तळ ठोकून बसले असल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. शासनाचा  निर्णय काहीही असो आम्ही मात्र  एकाच तालुक्‍यात काम करणार असल्याचे धोरण तलाठ्यांनी ठरवल्याचे दिसते आहे. तलाठ्यांच्या बदल्याचे आधिकार उपविभागीय अधिकारी यांना असतात. उपविभागीय अधिकारी तलाठ्यांच्या बदल्या यावर्षी भरल्या न झाल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष डुबल दिला आहे

       गेली अनेक वर्ष निवडणुका व दुष्काळ सदृश्य परिस्थिती दाखवीत असल्याने त्यांच्या बदल्या केल्या जात नव्हत्या. कोरोना या पार्श्वभूमीवर यावर्षी बदल्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र ऑगस्ट महिण्यात संपूर्ण बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश शासणाचे असल्याने या वर्षी तरी बदल्या होणार की नाही याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

        दर तीन वर्षांनी तलाठ्याची सजा बदलणे बाबत शासन निर्णय आहे व तालुक्याच्या बाहेर तलाठी जाणे शासनाला अपेक्षित आहे. परंतु तालुकाबाह्य बदल्या ही होताना दिसत नाहीत.

       पुरंदर मधील पाच वर्षापेक्षा जास्त कार्यकाळात तालुक्यात असणारे गावकामगार तलाठी कंसात वर्ष व महिने बाळासाहेब सोपान ढमढेरे (६ ) ,संजय सर्जेराव खोमणे (९ ), बापूसाहेब नामदेव देवकर, (९), बापुसाहेब दिनकर मोकाशी (१३), दिगंबर कृष्णा वनवे (६), महादेव रामचंद्र जरांडे (१४), नंदकुमार संपतराव खरात (८), विश्वास माधवराव आटोळे (६ -१०)  सोमेश्वर शंकर बनसोडे, (६) प्रफुल्ल बाळासाहेब व्यवहारे (१२), मनिषा नारायण भोंगळे (१०), निलेश नानाजी पाटील (१०), सुधाकर मारुती गिरमे  (१०), प्रमोद शंकर झुरुंगे (९), साईनाथ दामोदर गवळी (७), रूपाली नामदेव शेळके (८), सुनिता सहदेव वनवे (८),  संतोष यशवंत होले  (७), निलेश प्रल्हाद अवसरमोल (६) बाबू विठ्ठल आगे  (६) 

        दौंड तालुक्यातील गाव कामगार तलाठी सुनील ज्ञानेश्वर शिंदे(२२), शशिकांत आधार सोनवणे(२१-११), किशोर लक्ष्मण परदेशी(२१), दीपक गणपती पांढरपट्टे (१९-०४) उद्धव कैलास गोसावी (१८-०७), विनायक महादेव भांगे (१८-०६), सुदाम सखाराम मेचकर (१८-०६), संदीप झिंगाडे (१०-११), दगडु सखाराम यादव (१०- ०८)  जे. एस. भोसले (९-०३)  श्रीमती प्रतिभा रामहरी पवार (८- ०९), शंकर आप्पासाहेब दिवेकर  (८), प्रशांत चंद्रकांत जगताप (७-३), श्रीमती योगिता राजेंद्र कदम (७-३), श्रीमती मनीषा महेंद्र कदम (७-३), वर्षाराणी साधू दळवी (७-३), बाप्पू सूर्यमन जाधव (६-११), अर्जुन नागनाथ स्वामी (६-४), पुंडलिक नामदेव कोदरे (६-३) बजरंग केशव सोनवणे (५-५)

         हे तलाठी कार्यकाळ पूर्ण करून देखील तालुकाबाह्य बदलीसाठी पात्र असताना त्यांच्या बदल्या न करता इतर जे तालुक्यात एक-दोन वर्षापूर्वी आले आहेत त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News