कपाशीवरील गुलाबी बोंड अळी चे एकात्मिक व्यवस्थापन !!बांधावरची शेतीशाळा सदर


कपाशीवरील गुलाबी बोंड अळी चे एकात्मिक व्यवस्थापन !!बांधावरची शेतीशाळा सदर

संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

               🌱 बांधावरची शेतीशाळा🌱

नमस्कार मित्रांनो,

आजच्या भागात आपण कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीबद्दल माहिती जाणुन घेणार आहोत शेतकरी हि शेतकरी बंधूंसाठी फार मोठी समस्या झाली आहे.आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जालना जळगाव बीड यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कपाशीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तिला सामोरे जावे लागत आहे.यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे बीटी कपाशीचा लागवडीनंतर70/75 दिवसांनी गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो अगोदर पतंग   कपाशीच्या पानावर फुलांवर कंवर आणि कोवळ्या पानांवर अंडी घालतो अंड्यातून बाहेर पडलेल्या आळी तोंडात शिरून फुले गाळतात लहान असताना या बोंडात शिरून कोवळ्या बोंडातील पूर्ण बिया खातात त्यामुळे सरकीचे नुकसान होते ही आळी जुन्या तोंडात सुद्धा शिरते आणि बोंडातील तीन-चार पात्यांचे नुकसान करते फुलावर प्रादुर्भाव झाल्यावर फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात कोशावर कपासाच्या बिया आणि बोंडामध्ये पूर्ण होते त्याच्या एका बोंडामध्ये 10 ते 15 पर्यंत असू शकतात त्यामुळे रूईची प्रत बिघडते आणि सरकी तील तेलाचे प्रमाण सुद्धा कमी होते सरकी किडलेली असल्यामुळे बियाण्याची उगवणक्षमता कमी होते.      मादी पतंग जवळपास 150 अंडी पुंजक्यामध्ये घालते ही अंडी पात्या,फुले नवीन पानाच्या खालच्या बाजूला घालती जातात या अंड्यांच्या आकार 0 .5मी मी लांब आणि 0.25 मिलि रुंद असतो अंडी लांबट आणि चपटी असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत असतात

              पंधरा दिवसाचे बोंड किडीला अंडी घालण्यासाठी पसंतीचे ठिकाण असते अंडी उबविणेचा कालावधी 3 ते 6 दिवसाचा असतो अळीच्या पहिल्या दोन अवस्था पांढरट असतात आणि तिसऱ्या अवस्थेनंतर गुलाबी रंगाचा होतो अळीअवस्था 9ते14 दिवसाची असून डोके गर्द रंगाचे असते हे कोष साधारण 10 मिमी लांब बदामी रंगाचा असून ही अवस्था8 ते 12 दिवसात पूर्ण होते पूर्ण जीवनक्रम 3 ते 6 आठवड्यात पूर्ण होतो पतंग8 ते 10 मी मी तपकिरीकरड्या रंगाचे असून पंखावर काळे ठिपके असतात अशा कोषामधून सकाळयांच्या किंवा सध्या काळाच्या वेळी पतंग बाहेर पडतात ते निशाचर असून दिवसा मातीमध्ये किंवा जमिनीच्या भेगांमध्ये लपून बसतात.

            हिरव्या बोंडावर दिसणारे डाग हे गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव ओळखण्याची लक्षणे आहे हे त्याच प्रमाणे हिरव्या बोंड आळी वर अंदाजे 1.5 ते 2 मिमी व्यासाची लहान छिद्रे असतात सेंद्रिय बोंड आळी उपस्थित असल्याचे कळते ते या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास फुले पूर्णपणे उमलत नाही ती मुरडली जातात सुरुवातीला येणाऱ्या फुलोरा अवस्थेत आणि पिकाच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेत उघडलेल्या बोंडावर डाग आढळल्यास गुलाबी आळी मुळे नुकसान झाल्याचे दिसून येते.

  शेतकरी मित्रांनोआजच्या भागात आपण कपाशीवरील बोंड आळी बद्दल प्राथमिक माहीती साविस्तरपणे जाणुन घेतली आहे. पुढील भागात आपण बोंड आळीचा प्रार्दुभाववाढीची कारणे व त्यावरील निणयंत्रण याबद्दलची माहीती जाणुन घेणार आहोत.

         धन्यवाद.

 सहकार्य -निलेश बिबवे शेतीशाळा प्रशिक्षक कृषी सहाय्यक,तालुका कृषी विभाग कोपरगाव.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News