अनिलभैय्या राठोड यांच्या निधनाने शिवसैनिक पोरका झाला !!बिपीनदादा कोल्हे


अनिलभैय्या राठोड यांच्या निधनाने शिवसैनिक पोरका झाला !!बिपीनदादा कोल्हे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव -अहमदनगर शहर मतदार संघाचे तत्कालीन आमदार.अनिलभैया राठोड यांच्या अकाली निधनाने संघर्षातून कार्यकर्त्यांना ताकद देणारा जनसामान्यांचा नेता हरपला अशा शब्दांत संजिवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे यांनी शोक व्यक्त केला.

       स्वर्गीय अनिल भैया राठोड हे राजपूत समाजाचे आशास्थान होते.अहमदनगर शहर शिवसेनेचे अध्यक्ष या पदापासून सुरू केलेली कारकीर्द उपनेत्या पर्यंत जाऊन पोहोचली.अहमदनगर शहर मतदारसंघातून त्यांनी राज्याच्या विधिमंडळात पाच वेळा प्रतिनिधित्व केले.हिंदुत्व विचारांचा पगडा कायम ठेवत त्यांनी शिवसेनेची मतदारसंघात मोट बांधली, प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही मार्गदर्शन घेत नगर शहराचा कायापालट करण्यात मोठा वाटा उचलला. त्यांनी मातोश्री वृद्धाश्रम, नेता सुभाष तरुण मंडळ या माध्यमातून केलेले काम सदैव स्मरणात राहील.राज्याच्या नेतृत्वात त्यांना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.   सर्वसामान्यांचे काम झालेच पाहिजे हा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या निधनाने शिवसैनिक पोरका झाला असे बिपीनदादा कोल्हे म्हणाले.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा प्रथम महीला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ही स्वर्गीयअनिल भैय्या राठोड यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अहमदनगरच्या विकासाचे शिलेदार अनिलभैया राठोड यांच्या निधनाने हिंदुत्व विचारसरणी आणि सर्वसामान्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारा नेता आपल्यातून हरपला असुन शिवसेनेच्या माध्यमातून ते पाच वेळा विधानसभेवर निवडून आले.भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात त्यांनी अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून चांगले काम केले.कुठलाही राजकीय वारसा नसताना नगर मतदार संघातील सर्वसामान्यांना बरोबर घेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनिल भैय्यानी केलेले काम स्मरणात राहील. तसेच हिंदू एकता संघटनेचे नगर शहरात मोठे काम आहे.त्यांच्या अकाली निधनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे नेतृत्व हरपले अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी श्रद्धांजली वाहिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News