मानवी जीवनासाठी भविष्यात वृक्षांची गरज..सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत! स्नेहबंध तर्फे नगर तालुका पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण...


मानवी जीवनासाठी भविष्यात वृक्षांची गरज..सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत! स्नेहबंध तर्फे नगर तालुका पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण...

अहमदनगर -(प्रतिनिधी संजय सावंत) संपूर्ण जगात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. भविष्यात वृक्षांअभावी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मानवी जीवनावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात मानवी जीवनासाठी वृक्षांची गरज आहे, असे प्रतिपादन नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी केले. स्नेहबंध फौंडेशनतर्फे नगर तालुका पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, पोलिस उपनिरीक्षक धनराज जारवाल, पो.हे.कॉ.राजेंद्र ससाणे,चंद्रकांत कुसळकर, धर्मराज पालवे, भगवान गांगर्डे, म.पो.ना.प्रमिला गायकवाड, छाया रांधवन, हेमंत ढाकेफळकर, आकाश निऱ्हाळी आदी उपस्थित होते.

या उपक्रमात वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News