महसूल दिनानिमित्त शिर्डी उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार


महसूल दिनानिमित्त शिर्डी उपविभागातील  अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

अहमदनगर प्रतिनिधी (राजेंद्र दूनबळे)

: महसूल दिनानिमित्त येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात शिर्डी उपविभागातील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. साईसंस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, कोपरगांवचे तहसलिदार योगेश चंद्रे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी महसूल दिनाची माहिती सांगून त्याचे महत्व विषद केले.

            शिर्डी उपविभागातील नायब तहसिलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी तसेच तलाठी व अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसिलदार कुंदन हिरे तसेच कोपरगांवचे तहसिलदार योगेश चंद्रे यांचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला होता. शिर्डी उपविभागात कार्यरत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जलशक्ती अभियान, लोकसभा व विधानसभा निवडणूक, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना वेळेवर मदत देणे, अनुलोम अभियान, कोपरगांव शहराचा पाणी पुरवठा प्रश्न सोडविण्यासाठी पाच नंबर तळयाचा प्रश्न सोडविणे व इतर कार्यामध्ये सहकार्य करुन योगदान दिल्यामुळेच प्रातिनिधीक स्वरुपात दोन्ही अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले. आमचा गौरव म्हणजेच उपविभागात कार्यरत सर्वांचा गौरव असल्याचे प्रशंसोदगार त्यांनी काढले. तसेच भविष्यात सर्वांकडून असेच सहकार्य यापुढेही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र ठाकरे यांनीही सत्कारार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सूर्यतेज संस्थेचे संस्थापक सुशांत घोडके, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणाऱ्या महसूल यत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी 1 ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जातो.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News