श्रीगोंदा शहरातील नामांकित हॉटेल मध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा- ९० हजाराचा मुद्देमाल जप्त.


श्रीगोंदा शहरातील नामांकित हॉटेल मध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा- ९० हजाराचा मुद्देमाल जप्त.

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी : श्रीगोंदा शहरातील जामखेड रोडवर असलेल्या सृष्टी हॉटेलवर बुधवार दि.५ .जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव. यांच्या पथकाने छापा मारला असता. आरोपी जाग्यावर जुगार खेळताना सापडले.त्यांच्याकडून रोकड व जुगार साहित्य मिळून  ९०,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

            सृष्टी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर जुगार अड्डा चालू होता.तिरट नावाचा हारजीतीचा खेळ खेळताना आरोपी दिपक तुकाराम घालमे वय ३७ वर्षे रा. शिंदा ता. कर्जत, बाळनाथ बबन जाधव वय ४५ ,विलास मोहन रणसिंग वय २९, जगदीश गोरे वय २७, राजेंद्र गुंडीबा शेंडे वय ४२, दिलीप दिगंबर मस्के वय ३९ सर्व राहणार शेडगाव ता. श्रीगोंदा, भाऊसाहेब विठ्ठल थोरात वय ३३ सिद्धटेक ता. कर्जत, नारायण दत्तात्रय घालमे वय ३८ जलालपूर ता. कर्जत, महादेव साहेबराव जावडे वय ३५ पेडगाव ता. श्रीगोंदा व हॉटेल मालक मंगेश गांजुरे यांना रंगेहाथ पकडले.त्यांच्याकडून २३,३२० रुपयांची रोकड व ६७,००० रुपयांचे मोबाईल व जुगार साहित्य जप्त केले. त्यांच्याविरुद्ध कोरोना संसर्ग पसरविण्याचा धोका असूनही एकापेक्षा जास्त लोक जमून घातक कृत्य करण्याचा प्रयत्न करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पोलीस हवालदार संजय काळे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

       या कारवाईत पोलीस हवालदार झुंजार, खारतोंडे,अमोल आजबे, नय्यूम पठाण, गोकुळ इंगवले, योगेश भापकर, किरण जाधव यांनी सहभाग घेतला.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News