राहुरी फॅक्टरी येथील मनोज बोराडे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


राहुरी फॅक्टरी येथील मनोज बोराडे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

राहूरी फॅक्टरी / प्रतिनिधी-विजय एस भोसले 

राहुरी फॅक्टरी  येथील आदिनाथ वसाहत भागातील रहिवासी मनोज गणपत बोराडे या ३८ वर्षीय तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधबारी घडली आहे.दरम्यान मंगळवारी देवळाली प्रवरातील तरुणाने फाशी घेतल्यानंतर आज पुन्हा एका तरुणाने फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने एकच खळबळ उडाली आहे.

   मनोज याचे आई वडील भाऊ हे नाशिक गेले असता तो घरी एकटा होता. घरच्यांनी त्याच्याशी संपर्क केला परंतु संपर्क होत नसल्याने शेजारील व्यक्तीस मनोज जेवला का, काय करतो हे बघायला सांगितले त्यावर शेजारील त्या व्यक्तीने घराच्या दरवाजावरून उडी घेत घरात प्रवेश केला असता घरातील फॅनला ओढणीच्या सहायाने फाशी घेतलेल्या अवस्थेत मनोज दिसून आला. त्यानंतर सदर शेजारील व्यक्तीने खाली येऊन ही माहिती आजूबजूच्या नागरिकांना दिली. यावेळी नगरसेवक सचिन सरोदे, ज्ञानेश्वर वाणी, प्रदीप गरड यांनी घटनास्थळी येऊन पोलीस स्टेशनला आत्महत्या बाबतची खबर सांगितली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरवाजाचे कुलूप तोडून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश करून पंचनामा केला. याबाबत उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्याचे काम सुरू होते. 

 दरम्यान रविवारी देवळाली प्रवरात विहिरीत बुडून अक्षय ढुस या तरुणाचा दुदैवी मृत्य झाला त्यानंतर दोन दिवसांनी देवळाली शहरातील २२ वर्षीय मोलमजुरी करणाऱ्या तरुणाने व आज राहूरी फॅक्टरी येथील ३८ वर्षीय तरुणाने फाशी घेतल्याच्या घटनांने देवळाली प्रवरा व राहूरी कारखाना परिसरात खळबळ  उडाली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News