आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील गरजूंना मदत व अनाथ आश्रमातील मुलांना मिष्टान्नभोजन !!


आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त  ग्रामीण भागातील गरजूंना मदत व अनाथ आश्रमातील मुलांना मिष्टान्नभोजन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहराप्रमाणेच ग्रामीण भागात देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत सामाजिक उपक्रम राबविण्या बरोबरच ग्रामीण भागातील गरजूंना मदत करण्यात आली व काकडी येथील साईमुद्रा प्रतिष्ठान यांचे वतीने शिर्डी येथील साईआश्रया अनाथ आश्रमातील मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आले तर काही ठिकाणी विटभट्टी कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मास्क वाटप करण्यात आले आहे.

आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर आदी समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात.मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या व्हायरसने संपूर्ण विश्वात धुमाकूळ घातल्यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी वृक्षारोपण, नागरिकांना सॅनिटायझर वाटप व कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना किराणा साहित्याची मदत करून आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा केला आहे. यामध्ये माहेगाव देशमुख,करंजी, सोसायटी परिसरात,कोकमठाण व मुर्शतपुर स्मशानभुमी येथे वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत कुंभारी यांच्या वतीने कुंभारी गावातील प्रत्येक कुटुंबाचे कोरोनापासून बचाव होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असलेल्या हॅण्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.कोरोनाचे संकट व सुरु असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रोगराई वाढू नये व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी ब्राम्हणगाव येथे जंतुनाशक फवारणी करण्यात आली.मढी बु.येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करून आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते कारभारी आगवण,कर्मवीर शंकरराव काळे सह साखर कारखान्याचे संचालक श्री हरिभाऊ शिंदे,विठ्ठलराव आसने,सुधाकर रोहोम,संजय आगवन,जिल्हा परिषद सदस्य सौ.सोनालीताई साबळे,जिनिंग प्रेसिंगचे संचालक सुदाम लोंढे, उपसभापती अर्जुनराव काळे, माहेगाव देशमुख सोसायटीचे चेअरमन रविंद्र काळे, व्हा.चेअरमन प्रकाश काळे, उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे,पोलीस पाटील विक्रांत काळे,तंटामुक्ती अध्यक्ष राधाकिसन काळे,कुंभारीचे सरपंच प्रशांत घुले,उपसरपंच दिगंबर बढे,गणेश रक्ताटे,अजित रक्ताटे,शरद लोंढे,राजमुद्रा प्रतिष्ठान काकडी प्रभाकर गुंजाळ,महेश गुंजाळ,भारत रानवडे,अनिल गुंजाळ,गणेश गुंजाळ, रावसाहेब गुंजाळ, मनोहर सोनवणे,आबा रक्ताटे,प्रसाद साबळे,अनंत रक्ताटे,विशाल जाधव,सतीश रक्ताटे,अनिल रक्ताटे,दीपक कराळे,सभाजी देशमुख, भाऊसाहेब गायकवाड, राधाकिसन राऊत,तात्या रक्ताटे, पांडुरंग रक्ताटे,धनंजय रक्ताटे संदीप धिवर,कुंदन धिवर,ललित घोडे,सचिन रक्ताटे,सुनील रक्ताटे, सांडूभाई पठाण,माजी संचालक चांगदेव आगवण,नारायण आगवण,निवृत्ती आगवण, अप्पासाहेब आगवण,गोविंद शिंदे, बाबासाहेब कापसे,उत्तम गायकवाड,वसंत आराखडे, प्रसाद आगवण,सुनील जाधव, भाऊसाहेब आगवण,मुकुंद आगवण,गोपाळ कुलकर्णी, श्रीकांत आगवण,अण्णासाहेब शिंदे,नानासाहेब देवकर,रवी गायकवाड,अजू इनामदार,मुक्तार शेख,वाल्मिक गायकवाड, चांगदेव जाधव,कैलास चरमळ, संजय थोरात,बाजीराव चरमळ, संतोष चरमळ,पंढरीनाथ धनवटे, अवी डोखे,शिवाजी डोखे,सुनील मोकळ,अनिल दवंगे,नितीन शिंदे, सुनिल गिरमे,रोहीदास मोरे, संदीप बारवकर,अजित माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


- आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News