कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने राहाता तालुक्यातील बाभळेश्वर परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित


कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने राहाता तालुक्यातील बाभळेश्वर परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित

नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध

तहसिलदार कुंदन हिरे यांनी केले आदेश जारी

शिर्डी,प्रतिनिधी,राजेंद्र दूनबळे

शिर्डी,दि. : राहाता तालुक्यातील बाभळेश्वर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. यात, बाभळेश्वर गावातील बाभळेश्वर शिंदे वस्ती परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. तसेच सदर क्षेत्रातील नागरिकांचे तसेच वाहनांचे आगमन व प्रस्थान तसेच वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करण्यात आले आहे.

            राहाता तहसिलदार तथा इन्सीडंट कमांडर कुंदन हिरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री इत्‍यादी दिनांक  18 ऑगस्ट, 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांच्या  ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News