कुंभारी ग्रामस्थांचा वतीने कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांचे अभिनंदन !


कुंभारी ग्रामस्थांचा वतीने कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांचे अभिनंदन !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 कोपरगांवचे तहसिलदार मा.श्री योगेशजी चंद्रे साहेब यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी मा.श्री.राहुलजी द्विवेदी साहेब (भा.प्र.से) यांनी निवड करुन सन्मानित केले आहे या पाश्र्वभुमीवर कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामस्थांनी  तहसिलदार योगेश चंद्रे यांचे अभिनंदन केले आहे.

नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे महसुल दिनाचे औचित्य साधुन योगेशजी चंद्रे साहेब यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अहमदनगर येते सन्मान करण्यात आला आहे. मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्याची धुरा सांभाळताना श्री चंद्रे यांनी लोकसभा -२०१९ विधानसभा -२०१९ या दोन्ही निवडणूक त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या आहे.त्याचबरोबर सन २०१९ रोजी गोदावरी नदीला आलेल्या महापुर या संकटात मोठ्या हिमतीने प्रशासनाच्या सर्व घटक आणि जनतेला सोबत घेवून मोठी कामगिरी केली आहे.अनुलोम अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील पाझर तलाव खोलीकरणचे सन १९७२ चे दुष्काळानंतर सर्वाधिक मोठे काम घेतले आणि यशस्वीपणे केले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याचे आणि शेतीचे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी मोलाची मदत झाली आहे. कोपरगांव शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणारा ५ नंबर तळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. 

कोरोना संकटकाळात सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन  सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य अहोरात्र सुरु ठेवले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वेळेला कठोर निर्णय त्यांनी घेतले आहेत तसेच सतत लोकांच्या प्रश्नासाठी मनापासून अहोरात्र झटणारे कोपरगाव चे तहसिलदार योगेशजी चंद्रे साहेब यांच्या कार्याची दखल घेत उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव केला आहे त्यामुळे कोपरगाव च्या शिरपेचात एक मनाचा तुरा खोवला गेला आहे आहे कारण तहसीलदार श्री योगेश चंद्रे साहेब हे कोपरगाव तालुक्याचे रहिवाशी आहे. या त्यांच्या गौरवाबद्दल कुंभारी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News