आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवकांनी कोविड केअर सेंटरला दिले आरोग्य साहित्य


आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवकांनी कोविड केअर सेंटरला दिले आरोग्य साहित्य

आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड केअर सेंटरला आरोग्य साहित्य देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोरोना व्हायरसच्या वैश्विक संकटाला प्रतिबंध करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला सर्वोतोपरी मदत करून कोपरगावच्या नागरिकांसह आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आरोग्य अबाधित ठेवले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी आमदार आशुतोष काळे यांनी एस.एस.जी.एम. महाविद्यालयात सुरु केलेल्या कोपरगाव येथील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर, परिचारिका व संबंधित कर्मचारी यांना आरोग्य साहित्य देवून त्यांचा वाढदिवस साजरा केला.

                सध्या दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होतांना दिसत असून कोपरगाव तालुक्यात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवर यशस्वी उपचार करणारे डॉक्टर व त्यांचे सहकारी कर्मचारी यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी त्यांना कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले आरोग्य साहित्य यामध्ये पीपीई कीट, सॅनिटायझर,हँण्ड ग्लोज व कोविड केअर सेंटरच्या स्वच्छतेसाठी सोडिअम हायपोक्लोराईड देण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते, डॉ.सौ.वैशाली बडदे, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगुले,गटनेते नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे, संदीप पगारे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, हिरामण गंगुले,राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख,नवाज कुरेशी, डॉ.तुषार गलांडे,जावेद शेख, आदर्श पठारे,चंद्रशेखर म्हस्के, राहुल देवळालीकर,शुभम लासुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


            

जाहिरात
Search
विडिओ
Recent News