राहाता तालुक्यात शिवभोजन थाळी पुरविण्यासाठी निविदा सादर करण्याचे आवाहन


राहाता तालुक्यात शिवभोजन थाळी पुरविण्यासाठी निविदा सादर करण्याचे आवाहन

 शिर्डी ,( राजेंद्र दूनबळे)

दि.04 : शासन निर्देशानुसार राहाता तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब व गरजू नागरिकांना अन्न मिळावे यासाठी शिवभोजन थाळी सुरु करण्यात येणार आहे. यासाठी इच्छूक असणाऱ्या व्यक्तींकडून दिनांक 7 ऑगस्ट,2020 पर्यत तहसील कार्यालय, राहाता येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक व्यक्तींनी शिवभोजन थाळी सुरु करण्यासाठी अर्जासोबत हॉटेल, रेस्टारंटसाठी राज्य परवाना, अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी केलेला दाखला, आगप्रतीबंधक प्रमाणपत्र, वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, व्यावसायीक गॅस सिलेंडर प्रमाणपत्र व भोजनालय चालवण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र जोडावे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. शिवभोजन थाळीसंदर्भात प्राप्त झालेल्या अर्जांची मंगळवार, दिनांक 11 ऑगस्ट,2020 रोजी दुपारी 3-00 वाजता तालुकास्तरीय समितीकडून छाननी करुन पात्र अर्ज निवडण्यात येतील. सर्वसंबधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन राहाता तहसलिदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.  


 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News