नगर जिल्ह्यात 463 कोरोना रुग्ण वाढले


नगर जिल्ह्यात 463 कोरोना रुग्ण वाढले

नगर (प्रतिनिधी संजय सावंत :) जिल्ह्यात कालपासून आज सायंकाळपर्यंत कोरोना रूग्ण संख्येत ४६३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४४, अँटीजेन चाचणीत २९५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १२३ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३५९ इतकी झाली आहे. उपचारादरम्यान आज ०६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला आहे.    

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारी २२ रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये धुळे जिल्हा  ०१, अहमदनगर शहर ०५, भिंगार ०२, पारनेर १४ असे रुग्ण आढळले. त्यानंतर पुन्हा आणखी २२ रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये अहमदनगर शहरात ०६ : अहमदनगर शहर ०५, सारसनगर ०१. पारनेर ०३ :  पारनेर शहर ०१, रांजणगाव मशीद ०१, किन्ही ०१. अकोले ११ : शेटेमळा ५, लाडगाव ०१, सुगाव खुर्द ०१, उंचखडक ०२, बांगरवाडा (राजूर) ०२. भिंगार शहर ०१, नेवासा ०१ : चांदा ०१.

अँटीजेन चाचणीत आज २९५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये अहमदनगर शहर २८, संगमनेर १०,  राहाता ०२, पाथर्डी २२, नगर तालुका ११, श्रीरामपूर १५, भिंगार शहर १८, नेवासा १२, श्रीगोंदा ३३, पारनेर ४७, शेवगाव ३०,  कोपरगाव २०, जामखेड ०७ आणि कर्जत २४ अशा रुग्णांचा समावेश आहे.खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १२३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये अहमदनगर शहर १०६, संगमनेर ०५, राहाता ०३, नगर ग्रामीण ०३,  नेवासा ०१, शेवगाव ०१, कोपरगांव ०१, जामखेड ०१ आणि कर्जत येथील ०२ रुग्णांचा समावेश आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News