कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम राबवून असंख्य कार्यकर्त्यांकडून आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम राबवून  असंख्य कार्यकर्त्यांकडून आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा

आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम साजरा केला.  

           देशात व राज्यात कोरोना व्हायरस विषाणूने थैमान घातले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून  अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असून मागील काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात देखील दररोज कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेवून  कोरोना व्हायरसच्या वैश्विक संकटसमयी वाढदिवस साजरा करणे उचित नसल्याचे सांगत कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम होणार नसल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले होते.त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजिक उपक्रम राबविले.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोना बाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील कोव्हिड केअर सेंटरच्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट,हँड ग्लोव्हज व सॅनिटायझर देण्यात आले.पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी सुभद्रानगर परिसरात सौ.अंजली काळे यांच्या वतीने वृक्षारोपण करून या वृक्षांचे व्यवस्थित संगोपन व्हावं यासाठी सदर वृक्षांना संरक्षक जाळी बसवण्यात आल्या. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा, नगरसेविका सौ.प्रतिभा शिलेदार यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आले.ओ.बी.सी. सेलच्या वतीने कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना एन ९५ मास्क वाटप करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या वतीने कोपरगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयांना २५० लिटर सोडिअम हायपोक्लोराईड देण्यात आले.कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना व कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिसांना मास्क व कोरोनापासून बचाव व्हावा व रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी माजी नगरसेवक रमेश गवळी यांचेवतीने अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.तसेच ग्रामीण भागात देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवून आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळण्यात आले.  

                 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले, महिला शहराध्यक्ष सौ. प्रतिभाताई शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, ओबीसी सेल शहराध्यक्ष राहुल देवळालीकर,सोशल मेडिया सेल शहराध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे,संदीप पगारे, अजीज शेख, हिरामण गंगूले,राजेंद्र वाकचौरे,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,अनिरुद्ध काळे,संदीप कपिले,सुनील बोरा,सागर लकारे, संदीप सावतडकर,संदीप देवळालीकर,सौ.शितल लोंढे,सौ. भाग्यश्री बोरुडे,सौ.वैशाली भगत आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

             मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांना आमदार आशुतोष काळे यांना भेटून शुभेच्छा देण्याची मनस्वी इच्छा होती मात्र आमदार आशुतोष काळेयांनी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी नम्रपणे नकार दिल्यामुळे फेसबुक,व्हाटसॲप, ट्विटर,इंस्टाग्राम च्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यानी अक्षरश:शुभेच्छांचा पाऊस पाडला त्याचबरोबर राज्याचे विविध खात्याचे मंत्री,आमदार, खासदार यांनी देखील सोशल मेडियाच्या माध्यमातून आमदार आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


    

जाहिरात
Search
विडिओ
Recent News