दौंड शहरात ईद आणि रक्षाबंधन निमित्त कोरोनाची सुट्टी दौंड मध्ये 59 पैकी फक्त दोनच पोझिटीव,एकजण रिपीट,ग्रामीण भागात 9 पोझिटीव


दौंड शहरात ईद आणि रक्षाबंधन निमित्त कोरोनाची सुट्टी दौंड मध्ये 59 पैकी फक्त दोनच पोझिटीव,एकजण रिपीट,ग्रामीण भागात 9 पोझिटीव

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी-- दौंड शहरात कोरोनाने ईद आणि रक्षाबंधन ची सुट्टी घेतली आहे,शहरातील 59 व्यक्तींचे स्वाब घेतले होते,त्यापैकी दोन जण नव्याने पोझिटीव आले तर एकजण पुन्हा  रिपीट झाला आहे, तीन दिवस लगातार सुट्टी आल्यामुळे तीन दिवसांचे स्वाब आज प्राप्त झाले आहेत,59 व्यक्ती मध्ये तीन व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले.मात्र ग्रामीण भागात रुग्ण वाढले आहेत,एकूण 45 व्यक्तींचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 9 व्यक्ती पोझिटीव आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले,त्यामध्ये खुटबाव पुरुष 1,पारगाव पुरुष 1, कुरकुंभ पुरुष 2,तर वासुंदे येथील एकाच कुटुंबातील 5 जण पोझीटीव आले आहेत,त्यामध्ये दोन महिला व तीन पुरुष कोरोना बाधीत आले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News