कोरोना लढाईतील एक समर्थ नेतृत्व आमदार आशुतोष दादा काळे !! आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने ....


कोरोना लढाईतील एक समर्थ नेतृत्व आमदार आशुतोष दादा काळे !! आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने ....

वृत्तलेखन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

दि.४ऑगस्ट, कोपरगाव मतदार संघाचे लाडके नेतृत्व आमदार मा.आशुतोष दादा काळे यांचा वाढदिवस त्या निमित्ताने मतदार संघातील तमाम नागरीकांच्या वतीने हार्दीक शुभेच्छा 

 कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांचा समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन माननीय अशोक दादा काळे यांचा अनुभव आणि कार्य सदैव स्मरणात ठेवून आशुतोष दादा यांनी राजकारणातुन समाजसेवा हा वारसा पुढे चालवत सन 2019मध्ये विधानसभेत निवडून आल्यानंतर आशुतोषदादा यांनी मागील पाच वर्षातील रेंगाळलेली रस्ते पाणी, विज,या सामान्यासाठी कळीचा मुद्दा असलेल्या विकास कामांना प्राधान्य देत ती सुरु केली त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये नागरिकांना करावी लागणारी पायपीट थांबविण्यासाठी विविध योजनांचे भुमीपुजन करून मार्गी लावली असुन कोपरगाव शहरासाठी पाच नंबर तलावाचे काम हाती घेत ते लवकरच पूर्णत्वास आहे.आज तळागाळातील लहानात लहान कार्यकर्ता आमदार साहेबांना दादा या नावाने हाक मारते कारण मोठया भावाचे कर्तव्य ते समर्थपणे पार पाडत आहे.त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे या पावसाळ्यात तालुक्यातील पुर्व तसेच पश्चिम भागातील गावामध्ये झालेल्या ढगफुटीच्या पाश्र्वभुमीवर वेळेचा विचार न करता रात्रीच्या वेळी सुद्धा या भागात जाउन गावातील नुकसानग्रस्त नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची विचारपुस करून धीर देत प्रशासनाला नुकसान भरपाईचे आदेश देउन मोठया भावाचे कर्तव्य निभावले आहे.

देशासह राज्यात अचानक आलेल्या कोरोना नावाच्या संकटकाळत प्रशासनासोबत वेळोवेळी बैठका घेउन शहरासह तालुक्यातील नागरीकांचा आरोग्य रक्षणासाठी उपाययोजना केल्या असुन मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वेळेला कठोर निर्णय घेतले आहेत.  जनता दरबाराच्या माध्यमातून  लोकांचे प्रश्न दादांनी नुसती समजून घेतले नाही तर आज ते सुटताना दिसत आहेत उदाहरण पाहायची झाले मागील आठवड्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना च्या माध्यमातून अध्यापन निधीने मिळालेल्या सात हजार शेतकऱ्यांना इतर सर्वांना एक कोटी 40 लाखांचा निधी दादांनी मंजूर करून आणला शेतकऱ्यांचा वीज मंडळाचे प्रश्न पाटबंधारे खात्याच्या संदर्भातील प्रश्न दादांनी हाती घेतली व संबंधित पाणीपुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन ती कामे प्रगतीपथावर आहेत तालुक्यातील शेतकऱ्यांना तसेच नागरीकांना पूरप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आज कोराना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसाठी सुरक्षा किट तसेच इतर साहीत्य पुरवले असुन टाळेबंदीचा काळत मतदारसंघातील गोरगरीब जनता उपाशीपोटी राहु नये यासाठी आशुतोष दादांनी पिवळ्या रेशनकार्डधारकांना मोफत गहु तांदुळ डाळ इ साहित्याचे मोफत वाटप केले.तसेच

गोदाकाट महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून शहरातील तसेच ग्रामिण भागातील शेतकरी, नागरीकांना स्वतंत्र मार्केटिंग व्यवस्था व व्यासपीठ उपलब्ध करून दिली आहे.तसेच संपूर्ण कोरोना महामारीच्या पाश्र्वभुमीवर तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोसाका उद्योग समूहाच्या माध्यमातून जंतूनाशक फवारणी तसेच मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून कोरोना संसर्ग तपासणी तसेच प्राथमिक उपचारासाठी एस.एस.जी.एम महाविद्यालयाच्या होस्टेल विभागात स्वतंत्र वार्डची निर्मिती केली आहे.तसेच

   कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे कामही आमदारा करत आहे. त्यांच्या या समाजकार्याबद्दल तसेच वाढदिवासाचा निमित्ताने

 संजय भारती. कोपरगाव प्रतिनिधी (महाराष्ट्रभुमी मराठी न्युज) यांस कडुन हार्दीक शुभेच्छा.💐💐

जाहिरात
Search
विडिओ
Recent News