शिरूर महसुल पथकाची अवैद्यरित्या वाळु उपशावर दबंग कारवाई सहा बोटी फोडुन वाळुमाफीयांचे केले ३५ लाखांचे नुकसान


शिरूर महसुल पथकाची अवैद्यरित्या वाळु उपशावर दबंग कारवाई सहा बोटी फोडुन वाळुमाफीयांचे केले ३५ लाखांचे नुकसान

शिरूर आप्पसाहेब ढवळे प्रतिनिधी:

शिरूरचे निवासी नायब तहसिलदार श्रीशैल्य व्हट्टे यांनी तालुक्यात होत असलेल्या अनाधिकृत वाळु उपसा व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारल्याने वाळु माफीयांची पळता भुई थोडी झाली असुन शिरूरच्या महसुलच्या पथकाने नायब तहसिलदार व्हट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडनदी पत्रातुन दाणेवाडी ता.श्रीगोंदा हद्दीत अनाधिकृत वाळु उपसा करणा-या सहा बोटी फोडुन वाळ माफीयांचे सुमारे ३५ लाखांचे नुकसान केले.व्हट्टे यांच्यासह पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांमधुन काैतुक होत आहे.

         शनिवार दि.१ रोजी दाणेवीडी ता.श्रीगोंदा येथे घोडनदी पत्रात बोटींच्या सहाय्याने अवैद्यरित्या वाळु उपसा होत असल्याची माहिती शिरूर तहसिलचे निवासी नायब तहसिलदार श्रीशैल्य व्हट्टे यांना समजताच त्यांनी तत्काळ मंडलाधिकारी तीर्थंगिरी गोसावी,शिरुरचे कामगार तलाठी विजय बेंडभर,उरळगावचे कामगार तलाठी ज्ञानेश्वर चौधरी,करडेचे कामगार तलाठी प्रमोद लोखंडे,पोलीस उमेश जायपत्रे व पोलीस करणसिंग जारवाल आदिंचे पथक तयार करून घोडनदी नदीपात्रातुन दाणेवाडी येथे नदीपात्रात स्वतःनायब तहसिलदार व्हट्टे पथकासह उतरून बोटीने जाऊन अनाधिकृत वाळु उपसा करणा-या सहा बोटी फोडुन वाळुमाफीयांचे सुमारे ३५ लाख रूपयांचे नुकसान केले.शिरूर तहसिलचे निवासी नायब तहसिलदार श्रीशैल्य व्हट्टे यांनी तालुक्यात होत असलेल्या अनाधिकृत वाळु उपसा व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारल्याने वाळु माफीयांनी कारवाईचा धसका घेतला असुन पळता भुई थोडी झाली आहे.नायब तहसिलदार व्हट्टे यांच्यासह पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांमधुन काैतुक होत आहे.

आठ दिवसांपुर्वीही केली होती धडक कारवाई....

दि.२६/७/२०२० रोजी निवासी नायब तहसिलदार व्हट्टे यांना वडगावरासाई - इनामगाव रस्त्यावर अनाधिकृत वाळु वाहतुक होत असल्याची माहिती मिळताच पथकासह जाऊन मांडवगण जवळ कारवाई करून तीन ट्रक ताब्यात घेऊन शिरूर पोलीस स्टेशनला घेऊन येत असताना त्यातील एक बिगर नंबरचा ट्रक अचानक नागरगाव रोडने पळून जाऊ लागला. पळून जाणारा ट्रक  पकडण्यासाठी जीवाची पर्वा न करता नायब तहसीलदार व्हट्टे हे त्यांच्या गाडीने पथकासह पाठलाग करू लागले. काही अंतरावर त्या पळून जाणाऱ्या ट्रकला पथकाने गाठले व त्याला ट्रक थांबवण्यास सांगितले. परंतु त्या ट्रकचा चालकाने ट्रक थांबवण्यास नकार दिला.यावेळी महसूल पथकाने वाळूच्या ट्रकच्या पुढे जाऊन ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता. ट्रक चालकाने मोठ्याने ओरडून बोलला की "तुम्ही बाजुला व्हा अन्यथा ट्रक अंगावर घालण्याची धमकी देत ट्रक पळवुन नेला होता.याबाबत निवासी नायब तहसिलदार व्हट्टे यांनी शिरूर पोलीसांत तक्रार दाखल केलेली असुन शिरूर पोलीसांनी सदर ट्रक व चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी श्रावण गुपचे यांनी दिली.

अवैद्य गाैण खनिज उत्खनन किंवा वाहतुक होत असल्याची माहिती अथवा निदर्शनास आल्यास कारवाईसाठी एकटे न जाता पथक तयार करून तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.त्यासाठी लेखी पत्र किंवा परवानगीच घेतली पाहिजे असे काही नसुन उलट माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई केली म्हणुन संबंधीत अधिकारी व पथकातील कर्मचारी यांचे काैतुकच केले पाहिजे.

                        संतोषकुमार देशमुख

               उपविभागिय अधिकारी,  पुणे विभाग

शिरूर तहसिल कार्यालयात अवैद्य गाैण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करणा-यांना काैतुकाची थाप देऊन प्रोत्साहन देण्या ऐवजी उलट वरिष्ठ अधिका-यांकडुन नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समजत असुन असे झाले असल्यास कारवाई करून अशा प्रकारे नोटीसीचा प्रसाद ( प्रकारे वाळु माफीयांना पाठीसी घालण्याचा प्रकार ) मिळणार असल्यास अधिकारी व कर्मचारी अवैद्य गाैण खनिज व वाहतुकीवर कारवाई करण्यास धजवणार नाहित परिणामी वाळु माफीयांना मोकळे रान मिळेल व शासनाला मोठ्या प्रमाणात महसुलास मुकावे लागेल असे नागरिक बोलुन दाखवत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News