"कोरोना" ने अजिबात भेदभाव केला नाही... ॲड शिवाजी अण्णा कराळे


"कोरोना" ने अजिबात भेदभाव केला नाही... ॲड शिवाजी अण्णा कराळे

थोडंसं मनातलं....

कोविड-19 ने संपूर्ण देशभर थैमान घातले आहे. आता देशात कोविड-19 च्या चाचण्या फार मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यामुळे कोविड-19 चे रूग्ण सुद्धा जास्त प्रमाणात निष्पन्न झाले आहेत. परंतु शासनाने कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या आहेत आणि त्यामुळेच कोविड-19 ब-यापैकी  आटोक्यात येत आहे. एक मात्र निश्चितच आहेकी सध्या कोविड-19 ने बाधीत असलेल्या रुग्णांची संख्या ठणठणीत बरे होणारे रुग्णांचे पेक्षा कमी आहे. हे एक प्रकारे सरकारचे आणि आपल्या वैज्ञानिकांचे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. कोविड-19 ने मात्र अजिबात भेदभाव केला नाही. अगदी सर्व सामान्य माणसा पासुन तर नेते,अभिनेते, पुजारी, शासकीय अधिकारी, पोलिस, डाॅक्टर, आणि कर्मचारी यांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. यावरून एक गोष्ट निश्चितच लक्षात येते की," माणसं एकमेकात भेदभाव " करतात पण कोणतीही नैसर्गिक  "महामारी" कधीच भेदभाव करत नाही. फरक इतकाच की नेते मंडळी आणि अभिनेते मंडळी देशातील मान्यताप्राप्त मोठ्या खाजगी हाॅस्पिटल मध्ये ॲडमिट होतात, त्यांची सेवा करायला खुप मोठमोठी डाॅक्टर मंडळी तत्पर असतात तर काही डाॅक्टर मंडळी "आराध्या " ची कोणी तपासणी करायची यावरून आपसात भांडण करतात. याउलट  सर्व सामान्य जनतेला लवकर खाजगी हाॅस्पिटल मध्ये पैशा अभावी ॲडमिट करून घेतले जात नाही तर शासकीय हाॅस्पिटल मध्ये सुद्धा लवकर "बेड आणि औषधोपचार" मिळत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे. खरंच किती भेदभाव करतोय ना "माणूस" ? कधी कधी असे वाटते की, आत्ता पर्यंत कोविड-19 ने बाधीत झालेले देशातील आणि महाराष्ट्रतील नेते मंडळी , अभिनेते मंडळी, शासकीय अधिकारी व डाॅक्टर मंडळी हे शासकीय दवाखान्यात ॲडमिट का झाले नाहीत ? असो ही सगळी मंडळी ठणठणीत बरे व्हावीत आणि पुन्हा समाजसेवेत यावीत हिच ईश्वर चरणी प्रार्थना करुया. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री , केंद्रिय गृहमंत्री श्री अमित शहा साहेब आणि एक पुजारी महाराज यांना कोविड-19 ची बाधा झाली आहे. आता जनतेची कामं करताना किंवा कोणीतरी बाधीत व्यक्ती संपर्कात आल्यानेच त्यांना बाधा झाली असेल, पण नेहमीच वादग्रस्त विधान करण्यात पटाईत असलेले  काँग्रेस चे एक वजनदार नेते म्हणतात, " श्री राम मंदिर " च्या भूमिपूजनाचा मुहूर्त अशुभ असल्याने "भाजप" च्या नेत्यांना "कोरोना"  झालाय. यावरून काँग्रेस च्या नेत्याचा बालीशपणा दिसुन येतो तर दुसरीकडे अशा लोकांची "कीव" करावी वाटते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील राज्यसरकार चे मंत्री ना.अशोकराव चव्हाण साहेब, ना.धनंजय मुंडे साहेब, ना.जितेंद्र आव्हाड साहेब यांना सुद्धा कोविड-19 ने घेरले होते. तसेच कोविड-19 "मातोश्री" चा पण दरवाजा खटखटून आलाय ना मग या वेळी कोणता अशुभ मुहूर्त होता काय ?  कोविड-19 कोणत्याही प्रकारची जात पात आणि धर्म पहात नाही. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील परिस्थिती सुद्धा भयानक निर्माण झाली आहे. दररोज खुप मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधीत सापडतात. अर्थात कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत आणि जनतेनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे या बाबतीत अहमदनगर चे जिल्हाधिकारी मा. श्री राहुल द्विवेदी साहेब यांनी रविवारी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सांगितले आहे. तसेच अहमदनगर मधील लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि सामाजिक संस्था  आणि प्रशासन यांनी मिळून कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर मध्ये अनेक ठिकाणी खाजगी हाॅस्पिटल मध्ये व सामाजिक संस्थाचे माध्यमातून शहरात  कोविड-19 चे सेंटर सुरू केले आहेत तसेच तपासणी केंद्रे ही सुर केली आहेत. तसेच शासकीय दवाखान्यात सुध्दा अतिदक्षता विभागात बेडची व्यवस्था केली आहे.  आता तर जिल्हा  शासकीय दवाखान्यात दररोज जवळपास एक हजार लोकांची कोरोना चाचणी करण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच आता एक तासातच कोविड-19 चा रिपोर्ट पण उपलब्ध करून दिला जातो. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील ठणठणीत बरे झालेल्या रूग्णाची संख्या जवळपास 4365 च्या दरम्यान आहेत तर उपचार सुरू असलेले रूग्णाची संख्या जवळपास 2247 आहेत 78 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य तपासणी करून घेतली पाहिजे. ज्या लोकांना कोविड-19 ची लक्षणे दिसत असतील त्यांनी शासकीय दवाखान्यात विनामूल्य तपासणी करून घेण्याची सुचना सुद्धा मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी दिली आहे. आता कोविड-19 ला हद्दपार करायचे असेल तर प्रशासनाचे बरोबरीने जनतेने सुद्धा सतर्क राहिले पाहिजे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. मित्रांनो, खरंच जनता सुरक्षित रहावी म्हणून अनेक कोरोना योद्धे बळी गेले आहेत याची जाणीव आता आपणच ठेवली पाहिजे. त्यामुळे आता आपणच कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता एकमेकांना मदत केली पाहिजे. सध्या कोविड-19 च्या बाबतीत वेगवेगळ्या माध्यमातून आफवा पसरविल्या जात आहेत त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे, परंतु जनतेने फक्त शासकीय अधिकारी ज्या सुचना व आदेश देतील त्याचेच काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती आहे. अजुनही आपल्या हातातुन वेळ गेलेली नाही, त्यासाठी आपण आपली व परिवाराची काळजी घेणे आवश्यक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील सर्व व्यवहार व व्यवसाय पुर्णपणे सुरू केले आहेत. आता उद्या पासून काही अस्थापना नव्याने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सध्या तरी जनतेनी काळजी घेऊनच उद्योग व्यवसाय आणि कामं धंदा करणे गरजेचे आहे. कोविड-19 ने अजिबात भेदभाव केला नाही तर आपण सुद्धा भेदभाव न करता एकमेकांना मदत केली पाहिजे. शेवटी एकच सांगणे आहे की,जास्त माजल्यावानी करायचं नाही, नाहीतर बिगर विधी केल्याशिवाय फक्त नशीबी अमरधाम येणार यात शंकाच नाही. त्यामुळे नागरिक हो  शासकीय सूचना बरोबरच  सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स या तीनही गोष्टीचे जरूर पालन करावे हीच हात जोडून विनंती .घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जाहिरात
Search
विडिओ
Recent News