निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पुणे विभागच्या प्रसिद्धी प्रमुखपदी गुंडेगावचे संजय भापकर यांची नियुक्ती


निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पुणे विभागच्या प्रसिद्धी प्रमुखपदी गुंडेगावचे संजय भापकर यांची नियुक्ती

वाळकी विजय भालसिंग ( प्रतिनिधी ) नगर तालुक्यांतील गुंडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय उत्तम भापकर यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पुणे विभागासाठी प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यांत आली .मंडळाचे राज्य अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी श्री.भापकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . संजय भापकर यांच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या कार्याची दखल घेत नुकतीच त्यांची पुणे विभागासाठी प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यांत आली आहे . संजय भापकर यांचे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण व संवर्धन ,जलसंधारण प्रदूषणमुक्तीसाठी विविध उपक्रम चालू आहेत .मागील ६ ते ७ वर्षापासून ते सामाजिक चळवळीत कार्यरत आहे . श्री . भापकर यांनी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण मुक्तीसाठी जनजागृती करून मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली . या तरुण वयातच त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाल्याने संजय भापकर यांना निसर्गच्या सांनीध्यांत राहण्याची आवड असल्याने त्यातच त्याचे गुंडेगाव गाव हे निसर्गाने फुललेले एक खेडेगाव असून या तरुण सामाजिक कार्यकत्याने वृक्षवली आम्हा सोयरे हाच मंत्र मनी बांळगल्याने ते निसर्गप्रेमी बनले . या त्यांच्या सामार्जिक उपक्रमाचे गुंडेगाव मध्ये कुतुहलाचा विषय ठरला . निवडी बद्दल भापकर यांचे वृक्षमित्र आबासाहेब मोरे ,राज्य प्रसिद्धी प्रमुख नाना डोंगरे , गुंडेगावचे उभ्या महाराष्ट्राचे लाडके जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांनी अभिनंदन केले .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News