काऱ्हाटी दोन व राजबाग तीन आणखी कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह


काऱ्हाटी दोन व राजबाग तीन आणखी कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह

सुपे प्रतिनिधी / सचिन पवार 

    बारामती तालुक्यात आज नव्याने १७  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील सुपे येथील काळखैरेवाडी राजबाग मधील कोरोनाबधीत एका रविवार दि २ ऑगस्ट रोजी एक महिला रूग्ण आढळला होती ,आज त्याच कुटूंबातील आणखी तीन रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे , त्याचप्रमाणे काऱ्हाटी येथील रविवारी आढलेल्या रूग्णचा कुटूबांतील आणखी दोन रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह निघाला आहे. 

सदरील रुग्ण तालुक्यातील या गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे, यामुळे बारामती तालुक्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची आजखी संख्या १७ वर पोहोचलीय आहे. दरम्यान नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने पुढील कारवाई म्हणून प्रशासनाने राजबाग  आणि काऱ्हाटी या गावांना सील केलं असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.तसेच आरोग्य प्रशासनामार्फत रूग्णबाधीत परिसरात वेगवेगळ्या उपाय योजना सुरू असुन नागरिकांना प्रशासनास सहकार्य करावे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी केली आहे ,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News