वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहर स्वयंस्फूर्तीने मंगळवार पासून ३दिवस राहणार बंद


वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहर स्वयंस्फूर्तीने मंगळवार पासून ३दिवस राहणार बंद

श्रीगोंदा(प्रतिनिधी):- शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढून ठिकठिकाणी पत्रे लावले जात असल्याने शहर बंद ठेवण्याची मागणी सर्वच स्तरांतून झाल्याने अखेर सोमवारी व्यापारी असोसिएशन ,विविध संघटना यांनी प्रशासनाकडे 3 दिवस शहर मेडिकल,दूध,दवाखाने,पाणी वाटप वगळता बंद चा प्रस्ताव ठेवला त्यावर प्रशासनाने  शहरातील मागणी झाल्याने मंगळवार 4 ऑगस्ट पासून गुरुवार 6 ऑगस्ट पर्यंत शहर बंदला मान्यता दिली.या काळात शासकीय कार्यालये देखील बंद राहणार आहेत .यावेळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी 3 महिने नागरिकांनी नियमांचे पालन केल्याने कोरोना रोखला गेला पण अन लॉक चा चुकीचा अर्थ काढल्याने रुग्ण संख्या 200 पार झाली आता तरी नियमांचे पालन करून साखळी तोडण्याचे आवाहन केले व सर्व नागरिकांनी प्रशासनास व बंद निर्णयास सहकार्य करुन स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी केले आहे

----------------///-- ------------------


जाहिरात
Search
विडिओ
Recent News