शिंगणापूर येथे दुध दरवाढीसाठी दुधउत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन !!


शिंगणापूर येथे दुध दरवाढीसाठी दुधउत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर येथे 1ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच भारतीय जनता पार्टी कोपरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर येथील दुधउत्पादक शेतकरी तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त यांनी दुध दरवाढीसाठी आघाडी सरकार विरोधात आंदोलन छेडले. 

मागील चार महीन्यापासुन कोरोना महामारीमुळे अत्यंत अडचणीत आलेला शेतकरी फक्त दुग्ध व्यवसायावर आपली उपजिवीका करत आहे.आघाडी सरकार सत्तेवर येण्यापुर्वी राज्यात दुधाला ३०ते ३२ रूपये भाव मिळत असे परंतु आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी जाणुन बुजुन शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव कमी केले आणी दुधसंघाचे भाव मात्र जैसे थे आहेत.याचा निषेध म्हणून दिनांक 1 ऑगस्ट रोजी आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे तरी वर्तमान सरकारने 

 दुधाला तीस रुपये हमी भाव द्यावा तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर दहा रुपये अनुदान जमा करावे,

 अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला 50 रुपये अनुदान द्यावे 8.5.SNf व 3.5 Fat असलेल्या दुधाला पूर्वी 30 पैसे डिडक्शन होते ते आज एक रुपया केल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे ते ताबडतोब 30 पैसे करावे या सर्व मागण्या ताबडतोब मान्य कराव्या.असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

यावेळी भिमा संवत्सरकर, ग्राम पंचायत सदस्य सुनिल शिंदे, मच्छिद्र लोणारी,यादवराव संवत्सरकर,रंगनाथ संवत्सरकर, शेखर कुऱ्हे,संजय तुळसकर, दिलीप आढाव,शरद कुऱ्हे या सह अनेक दुध उत्पादक शेतकरी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News