दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोप देऊन सत्कार पर्यावरण संवर्धनाची चळवळ बहरण्यासाठी पुस्तकी धडे कृतीत उतरण्याची गरज -पै.नाना डोंगरे


दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोप देऊन सत्कार  पर्यावरण संवर्धनाची चळवळ बहरण्यासाठी पुस्तकी धडे कृतीत उतरण्याची गरज -पै.नाना डोंगरे

वाळकी (प्रतिनिधी विजय भालसिंग =महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने रोप देऊन सत्कार करण्यात आला. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.

आरती सुरेश अंधारे (कन्या विद्यालय) व साहिल बागवान (श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश अंधारे, रामचंद्र अंधारे, राहुल अंधारे, सारिका अंधारे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे,शाहरुख शेख, प्रतिभा डोंगरे आदी उपस्थित होते. पै.नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरणाच्या जागृकतेबरोबर वृक्षरोपण व संवर्धन होणे आवश्यक आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले जातात. मात्र ही चळवळ बहरण्यासाठी पुस्तकी धडे कृतीत उतरण्याची गरज आहे. युवा पिढीने पर्यावरण संवर्धनाला हातभार लावल्यास बदल घडणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने प्रत्येक वर्षी एक झाड लावून ते जगविण्याचे आवाहन त्यांनी केले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News