डॉ. तनपुरे कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे राजीनामे मंजूर राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी-विजय एस भोसले .


डॉ. तनपुरे कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे राजीनामे मंजूर  राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी-विजय एस भोसले .

राहूरी तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे .सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन. उदयसिंह पाटील व व्हाइस चेअरमन यांनी .आपल्या पदाचे राजीनामे दिले असून .आज ते संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत. येत्या दहा दिवसांत नवीन चेअरमन व व्हाइस चेअरमन निवडले जाणार आहेत.

  तनपुरे कारखान्यावर ४ वर्षांपूर्वी माजीमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळाकडे कारखान्याची सत्ता दिल्यानंतर चेअरमन म्हणून उदयसिंह पाटील तर व्हाइस चेअरमनपदी शामराव निमसे यांना जबाबदारी दिली. आजतागायत त्यांच्याकडेच ही जबाबदारी होती. तीन वर्षे बंद पडलेला कारखाना पूर्ववत सुरू झाला. दोन वर्षे गळीत हंगाम यशस्वी झाला. मात्र गेल्यावर्षी उसाची टंचाई असल्याने कारखाना बंद राहिला.जिल्हा बँकेचे कर्ज थकल्याने कारखाना बँकेच्या ताब्यात जाण्याची शक्यता असताना माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले मदतीला धावले.खासदार सुजय विखे , चेअरमन उदयसिंह

 पाटील  व सर्व संचालक मंडळाच्या  विनंतीवरून जिल्हा बँकेने कर्जफेडीसाठी एक वर्ष मुदतवाढ दिल्याने यंदा कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.

 दरम्यान कारखाना चेअरमन व व्हाइस चेअरमन यांच्या बदलाविषयी गेल्या काही महिन्यांपूर्वी चर्चा सुरू होती. काही संचालकानी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र नंतर ही चर्चा पूर्णपणे थँडावली.

मात्र २८ जुलै रोजी चेअरमन उदयसिंह पाटील व व्हाइस चेअरमन शामराव निमसे यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. आज संचालक मंडळाची बैठक पार पडली या बैठकीत राजीनामे मंजूर करण्यात आले. कारखाच्याची निवडणूक पुढील वर्षी होणार असून नवीन पदाधिकारी यांना १ वर्ष काम करण्याची संधी भेटणार असून चेअरमन पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही नामदेवराव ढोकणे यांचे नाव आघाडीवर आहे तर व्हाइस चेअरमन पदासाठी के. मा.कोळसे, रवींद्र म्हसे, मच्छिंद्र तांबे, विजय डौले, सुरसिंग पवार यासह अनेक संचालक इच्छुक असून विखे पितापुत्र कोणाला संधी देणार हे येत्या १० दिवसांत स्पष्ट होणार हे मात्र नक्की.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News