श्रीगोंदा लीड घेणार का काष्टी लीड घेणार सोशल मीडियावर या चर्चेला उधाण,तीन दिवसांसाठी श्रीगोंदा शहर बंद


श्रीगोंदा लीड घेणार का काष्टी लीड घेणार सोशल मीडियावर या चर्चेला उधाण,तीन दिवसांसाठी श्रीगोंदा शहर बंद

विठ्ठल होले पुणे

श्रीगोंदा प्रतिनिधी-- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे,त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे,श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा शहर लीड घेणार का काष्टी लीड घेणार याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे,श्रीगोंदा  शहरात रुग्णांची वाढणारी संख्या ही श्रीगोंदा शहर आणि तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे,तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे,त्यामुळे श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी पुढील तीन दिवस मंगळवार,बुधवार आणि गुरुवार  4,5 आणि 6 अागस्ट रोजी श्रीगोंदा शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत सोशल मीडियावर शहर बंद ठेवण्याविषयी चर्चा होती, श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे नगराध्यक्ष,नगरसेवक सर्व, व्यपारी संघटना,पोलीस निरीक्षक यांची तहसीलदार महेंद्र माळी यांचे सह बैठक घेऊन सदरचा निर्णय घेण्यात आला आहे, यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, नगराध्यक्षा सौ शुभांगी पोटे,बाबासाहेब बोस,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सर्व नगरसेवक आणि व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,यावेळी तहसीलदार महेंद्र माळी यांनी  सर्व जनतेने नोंद घ्यावी,तसेच कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News