शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण
गेल्या काही महिन्यापासून शेवगाव तालुक्यामध्ये सततच्या लॉकडाऊन व जमाव बंदी आसल्यामुळे तसेच एसटीचा प्रवास बंद झाल्यामुळे तसेच जरी शेतकरी उपस्थित राहीले तरी सेतुकेंद्रा मध्ये सर्वर सतत चालत नव्हते आणी सर्वर चालू झालेतर एक ते दिड तास एक एक फॉर्म भरण्यासाठी वेळ लागत होता तर त्यामधील काही सेतूकेंद्र कोरोना मुळे बंद होती त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नाही
त्यातच शेवगाव तालुक्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे
त्या शेतकऱ्यांना पीक विमा भरणे अत्यंत आवश्यक आहे आधीच शेतकरी कोरोना मुळे परेशान अाहे, दुधाला भाव नाही भाजीपाल्याला भाव नाही
हाताला काम नाही आणी पीक विमा भरला नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या शिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे तातडीने 15 ऑगस्ट पर्यंत पीक विम्याची मुदत वाढ मिळावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यार्थी आघाडी शेवगाव तालूका अध्यक्ष दिपक बडे यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे करण्यात आली आहे