निसर्ग व पर्यावरण मंडळ, डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वृक्षरोपण करुन रक्षा बंधन साजरा


निसर्ग व पर्यावरण मंडळ, डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वृक्षरोपण करुन रक्षा बंधन साजरा

लावलेल्या झाडांचे बहिणीप्रमाणे रक्षण करण्याचे संकल्प

वाळकी (प्रतिनिधी विजय भालसिंग) निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने रक्षा बंधननिमित्त वृक्षरोपण करुन झाडांच्या संवर्धनाची शपथ घेण्यात आली.  अरणगाव (ता. जामखेड) येथे झालेल्या कार्यक्रमात डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी माजी सरपंच संतोष निगुडे, उपसरपंच अर्जुन कारंडे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पै.अय्युब शेख, भालचंद्र नागरगोजे, देवानंद निगुडे, शुभम राऊत, अक्रम शेख, महिला कुस्तीपटू माधूरी भोसले, सुकेशिनी राऊत उपस्थित होते. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाभर वृक्षरोपण व बीजरोपणाचे कार्यक्रम सुरु आहेत. या उपक्रमातंर्गत संस्थेच्या वतीने रक्षा बंधन निमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पै.नाना डोंगरे म्हणाले की, झाडे मनुष्याला ऑक्सीजनरुपात जीवन देणारी राष्ट्रसंपत्ती आहे. झाडांची बेसुमार कत्तल झाल्याने पर्यावरणाचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. वृक्षरोपण काळाची गरज बनली असून, प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून दरवर्षी वृक्षरोपण व त्याचे संवर्धन केले पाहिजे. पर्यावरण संवर्धनाची ही लोकचळवळ उभी राहण्यासाठी संस्थेच्या वतीने जागृती करण्यात येत असल्याचे सांगून, त्यांनी रक्षा बंधनाच्या दिवशी लावलेल्या झाडांचे बहिणीप्रमाणे रक्षण करण्याचे त्यांनी आवाहन केले.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News