बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)
बारामती तालुक्यातील निंबुत गावचे सुपुत्र सहकारातील अभ्यासु व्यक्तिमत्त्व, कै. भगवानराव साहेबराव काकडे-देशमुख यांचे चिरंजीव, बारामती पंचायत समितीचे माजी सदस्य अँड.रतनराव काकडे-देशमुख यांचे नुकतेच वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांचे एल.एल.बी.चे शिक्षण पुण्यातील लाँ कॉलेज येथे झाले. त्यांनी बारामती येथे वकिली केली ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ऑफिस सुप्रीटेंड व प्रोजेक्ट ऑफिसर होते, तसेच नीरा व्हॅली सहकारी डिस्टरलीचे कार्यकारी संचालक होते. त्याचप्रमाणे बारामती तालुका पंचायत समितीचे सदस्यही होते, त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवली ते बाबालाल काकडे निरा कॅनॉल खरेदी विक्री संघाचे संचालकही झाले. भगवानराव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे त्यांनी चेअरमनपदही भूषवले अशा अनेक मानाच्या प्रमुख पदावर त्यांनी काम केले होते. त्यांच्या जाण्याने नीरा, निंबुतसह सोमेश्वरनगर परिसरात हळहळही व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, विवाहित दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील बागायतदार ऋतुराज काकडे व भगवानराव विविध कार्यकारी सोसायटी खंडोबाचीवाडीचे अध्यक्ष ऋषिकेश काकडे यांचे ते वडील होत.