इंदापुरात केले अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे


इंदापुरात केले अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे

 इंदापूर. काकासाहेब मांढरे प्रतिनिधी :

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यामध्ये उपक्रमशील शिक्षिका श्रीम. संतोषी वखरे यांनी चिंचेची शंभर रोपे तयार केलीआणि करंदिच्या, सिताफळच्या बीया मुलांनी संकलन केलेल्या होत्या . प्रशालेतील मुलांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावे यासाठी त्यांच्या उपस्थितीत झाडांना राखी बांधण्यात आली. त्याच बरैबर वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन सदर रोपे इंदापुरातील शहा ब्रदर्स मार्फत चालविण्यात येणाऱ्या मोफत रोपवाटिकेस भेट म्हणून देण्यात आली. यावेळी कु. हर्षदा रविंद्र कदम व चि. सूर्यम बाबासाहेब सस्तारे, मधुरा बनकर, अक्षरा बनकर, या चिमुकल्यांनसमवेत मुलांनीआणि उपस्थित मान्यवर सौ.अंकिताताई शहा, श्री. मुकुंद शेठ शहा शाळेतल्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली .तसेच यावेळी पालक बाबासाहेब सस्तारे आणि अतुल साळुंखे सर आवर्जून उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News