जन्मलेले मुल आपले नाही असे म्हणत त्याने पाच महिन्याच्या बाळाला विहिरीत फेकून दिले; पोलिसांनी केली निर्दयी बापाला अटक -


जन्मलेले मुल आपले नाही असे म्हणत त्याने पाच महिन्याच्या बाळाला विहिरीत फेकून दिले; पोलिसांनी केली निर्दयी बापाला अटक -

इंदापूर. काकासाहेब मांढरे प्रतिनिधि :

पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पाच महिन्यांपूर्वी  जन्मलेले मुल हे आपले नाही या कारणास्तव  निर्दयी पित्याने ते बाळ पाण्याने भरलेल्या विहीरीत फेकुन दिले. त्यात त्या बाळाचा दुर्दैवी मृृृत्यु झाल्याची घटना वरकुटे खुर्द (ता.इंदापूर) येथे घडली. पोलीसांनी नराधम पिता मनोज दत्तू शिंदे याला बेड्या ठोकत इंदापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस  सात दिवसांची पोलीस कोठडी  ठोठावली आहे. याबाबत मयत बाळाचे मामा दिपक मच्छींद्र तांबवे (वय 20 रा.अण्णाभाऊ साठे नगर मोहोळ,जि.सोलापूर ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती मनोज दत्तु शिंदे, सासु कांताबाई दत्तु शिंदे व जाऊ पियुषा बबन शिंदे यांचेविरूद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवार दिनांक 31जुलै 2020 रोजी सकाळी 6:30 वा.चे सुमारास पूजा हिने तिच्या सासरी असताना पाच महिन्याच्या बाळाला दुध पाजुन राहत्या घरातील झोळीत झोपविले व ती दुध आणण्यासाठी शेजारील वस्तीवर गेली असता तिचे पती मनोज दत्तू शिंदे यांनी या संधीचा फायदा घेऊन पाच महिन्याच्या ध्रुव या बाळाला शेजारील पाण्याने भरलेल्या विहीरीत फेकुन दिले. पुजा बाहेरून दुध घेवुन घरी आली असता तिला झोळीत बाळ दिसले नाही. त्यावेळी पुजाने तिचा पती व सासु यांना बाळाबद्दल विचारले असता तिचा पती मनोज याने तो विहीरीवर पाणी भरायला गेला असेल बघ असे म्हणून निर्दयीपणाने झोपुन गेला.

त्यानंतर ध्रुवचा शोध आजुबाजुला घेत असताना तो सापडला नाही. त्यावेळी राजु हणुमंत शिंदे ( रा.वरकुटे खुर्द, ठवरे वस्ती ) याने बाळ शेजारील विहीरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे घरी येवुन सांगीतले. त्यानंतर विहीरीत पाहीले असता बाळ पाण्यात तरंगत असल्याचे दिसुन आले. त्यानंतर बाळाला पाण्यातुन बाहेर काढुन उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता बाळ मयत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगीतले. यावरून इंदापूर पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद पुजा हीचा भाऊ दीपक मच्छींद्र तांबवे (रा.मोहळ जि.सोलापूर) याने दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बीराप्पा लातुरे हे करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News