अन्याय अत्याचार निर्मूलन समिती अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष कु.किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिस स्टेशन येथे राखी पौर्णिमा सण साजरा करण्यात आला


अन्याय अत्याचार निर्मूलन समिती अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष कु.किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिस स्टेशन येथे राखी पौर्णिमा सण साजरा करण्यात आला

शिर्डी  प्रतिनिधी:राजेंद्र दूनबळे

रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या प्रेमाचा विश्वासाची साक्ष देणारा असून हा सण संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा होत आहे अनेक सेलिब्रिटी अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गज आनंदाने रक्षाबंधन सण साजरा करतात. यामध्ये अनेक सेलिब्रिटी राजकीय व्यक्ती रक्षाबंधनच्या दिवशी बहीण-भावाचं नातं जपून हा सण आनंदाने साजरा करतात त्याचप्रमाणे अन्याय अत्याचार निर्मूलन समिती मा.रवींद्र दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ.रमादेवी धीवर महिला जिल्हाध्यक्ष, निखील भोसले (युवक जिल्हाध्यक्ष) ,कु. किरण जाधव (अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्त्वाखाली शिर्डी पोलिस स्टेशन येथे जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक  मिथुन घुगे,पोलिस निरीक्षक दीपक गंधले,राहाता तालुका अध्यक्ष श्याम गाडेकर, राहाता तालुका सचिव सुलतान सय्यद, राहाता तालुका उपाध्यक्ष रचना पाटणी, शिर्डी शहरअध्यक्ष आकाश जाधव,जुबेर पठाण शिर्डी शहर सरचिटणीस, सौ. माया गाडेकर, पवन शेजवळ आदी पदाधिकारी आणि पोलिस बांधव उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक दीपक गांधले साहेब यांनी रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा दिल्या आणि मनोगत व्यक्त केले व समितीच्या पदाधिकारी यांचे आभार मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News