देवगडचे महंत गुरूवर्य भास्करगिरीजी महाराज अयोध्येला रवाना


देवगडचे महंत गुरूवर्य भास्करगिरीजी महाराज अयोध्येला रवाना

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) 

नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज आज अयोध्येला रवाना झाले. जय श्री राम, जय श्री राम अशा घोषणेने परिसर दणाणून गेला. भक्ताच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.5 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभ हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या शिलान्यास सोहळा होणार आहे. श्रीगुरुदेव दत्त पीठाचे महंत प.पूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांना या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण आहे. महंत भास्करगिरीजी महाराज हे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान विश्वस्त मंडळ पंढरपूर या देवस्थानचे विश्वस्त असून श्रीराम जन्मभूमी आंदोलनावेळी महाराष्ट्र कारसेवा समितीचे भास्करगिरीजी महाराज प्रमुख होते. श्री राम जन्मभूमि अयोध्येतील अनेक आंदोलनांमध्ये भास्करगिरी महाराजांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. राम जन्मभूमि अयोध्या येथे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर भूमिपूजन समारंभ होत आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या ट्रस्टच्या वतीने विशेष अतिथी म्हणून महाराजांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून न्यासाचे विश्वस्त असलेले गोविंद गिरीजी महाराज व भास्करगिरी महाराज हे विशेष निमंत्रित आहे.

या प्रसंगी भास्करगिरी महाराज बोलतांना म्हणाले की, माऊली, तुकोबांच्या संत भूमीतून श्री पांडुरंग परमात्मा तथा भगवान श्री दत्तप्रभूंचे आशीर्वाद तथा सर्व सद्भक्तांच्या सश्रद्ध आदरयुक्त भावना घेऊन व पूजनीय संतांच्या वतीने श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांचे आशीर्वादासह अत्यंत विनम्र तथा सश्रद्ध अंतकरणाने आम्ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनास संत भूमीतून देवभूमीत प्रस्थान करत आहोत. राममंदिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणुसकीला सुरुवात होणार आहे. ज्या सुवर्ण क्षणाची गेली पाचशे वर्ष सर्व देशवासी आतुरतेने वाट पाहत होते तो सुवर्ण क्षण बुधवार दि, 5 ऑगस्ट रोजी येत आहे. देशातील पूजनीय वंदनीय संत सज्जनांच्या प्रमुख उपस्थित पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होत आहे. श्रीराम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या विश्व हिंदू परिषदेचे सर्व श्रीराम भक्तांचे कारसेवकांचे आम्ही आभार तथा अभिनंदन व्यक्त करतो. तसेच या कार्यासाठी ज्या श्रीराम भक्तांनी कारसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे प्रति आदरभाव तथा संवेदना व्यक्त करत त्यांना यानिमित्ताने शतशत नमन करतो. महंत भास्करगिरी महाराज यांना श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या ट्रस्टच्या वतीने विशेष अतिथी म्हणून महाराजांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे श्री क्षेत्र नेवासा श्री क्षेत्र देवगड वारकरी संप्रदाय सह राज्याला स्वाभिमानाची गोष्ट आहे. अनेक वर्षांपासून अंतकरणाचा जो राममंदिर होणाचा संकल्प होता तो पूर्ण होणार आहे.

महंत शिवाजी महाराज देशमुख, ज्ञानेश्वर महाराज देवस्थान

जाहिरात
Search
विडिओ
Recent News