राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे सारोळा कासारचे नूतन सरपंच जयप्रकाश कडूस पाटील यांचा सत्कार


राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे सारोळा कासारचे नूतन सरपंच जयप्रकाश कडूस पाटील यांचा सत्कार

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) सारोळा कासार गावचे नूतन सरपंच जयप्रकाश कडूस पाटील हे न्यू आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस) माजी विद्यार्थी आहेत.नगर तालुक्यातील सारोळा कासार गावच्या नूतन सरपंचपदी जयप्रकाश कडूस पाटील यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे अनिल सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी राज्य शिक्षकेतर महामंडळाचे राज्य सचिव गोवर्धन पांडुळे,रुद्र अपंग संघटनाचे (महाराष्ट्र राज्य )जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे, स्वराज्य टेक्निकलचे शाखाधिकारी सुरेंद्र सोनवणे,प्रेस फोटोग्राफर अमोल भांबरकर,माजी चेअरमन शिक्षक नेते संजय धामणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक संजय काळे,नगर तालुका दूध संघाचे संचालक गोराभाऊ काळे,राजाराम धामणे,ग्राम पंचायत सदस्य नामदेव काळे,गजानन पुंड, सामाजिक कार्यकर्ते सतीश कडूस आदी उपस्थित होते.    

सत्काराला उत्तर देताना जयप्रकाश कडूस पाटील म्हणाले कि,मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्काराने भारावून गेलो आहे.कॉलेज जीवनातील मित्रांनी सत्कार केल्याने मला ऊर्जा मिळाली आहे.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कॉलेज जीवनातच जलसंधारणाच्या कामाचे महत्व समजले आहे.गावच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.                                                   

जाहिरात
Search
विडिओ
Recent News