लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उक्कडगाव येथे साजरी.अण्णा भाऊंना भारतरत्न ने सन्मानित करण्याची मागणी…


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उक्कडगाव येथे साजरी.अण्णा भाऊंना भारतरत्न ने सन्मानित करण्याची मागणी…

श्रीगोंदा: अंकुश तुपे प्रतिनिधी:

उक्कडगाव येथे सत्यशोधक साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे ही जयंती सोशल डिस्टसिंगचे नियम पालन करून करण्यात आली. दलित महासंघ महिला आघाडीच्या श्रीगोंदा तालुका महिला अध्यक्षा सौ. पुष्पाताई प्रवीण शेंडगे व त्यांचे सर्व सहकारी महिला यांनी साजरी केली. यावेळी विमल हरिहर, मंगल पाडळे सोनाली जेठे, मंगल पठारे, आशा शेंडगे, लता लोंढे, इंदुबाई पठारे, आदी महिला उपस्थित होत्या. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. अशी मागणी बहुजन समता पार्टी श्रीगोंदा व दलित महासंघाच्या वतीने ग्रामपंचायत उकडगाव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News