कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांची लूट व पिळवणूकथांबविण्यासाठी हुतात्मास्मारकात महागांधीगिरी क्रांती घंटानाद आंदोलन


कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांची लूट व पिळवणूकथांबविण्यासाठी हुतात्मास्मारकात महागांधीगिरी क्रांती घंटानाद आंदोलन

ग्रामपंचायतीवर प्रशासकऐवजी लोकभज्ञाक अष्टप्रधान मंडळ नेमण्याचे प्रस्ताव पूजन

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) कोरोनाच्या नावाखाली खाजगी दवाखान्यात सर्वसामान्य रुग्णांची चालू असलेली आर्थिक लूट व जिल्हा रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने रविवारी हुतात्मा स्मारकात महागांधीगिरी क्रांती घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीवर पक्षातील कार्यकर्ते किंवा सरकारी कर्मचारी प्रशासक नेमण्याऐवजी ग्रामसभेच्या माध्यमातून लोकभज्ञाक अष्टप्रधान मंडळ नेमण्याचे प्रस्ताव पूजन करण्यात आले. 

स्नेहालयाचे डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते घंटानाद करुन या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे उपस्थित होते. तर वेबीनारद्वारे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी निसर्गोपचार औषध पध्दतीचा अवलंब करुन रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. तर कोरोनाच्या उपचारासाठी नागरिकांना परवडेल असे दर निश्‍चित करुन त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. कोरोना महामारीचा फायदा घेऊन अनेक खाजगी हॉस्पिटलनी सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लूट सुरु केलेली आहे. या रोगावर उपचार नसून देखील लाखोंच्या घरात बील येत आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी हेळसांड चालू आहे. सरकारने कोरोनाच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयाचे दर निश्‍चित करुन, सरकारी रुग्णालयात सोय-सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत मध्ये खाजगी व्यक्ती किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रशासक म्हणून नेमण्याची मंजूरी देण्यात आली. न्यायालयाने खाजगी व्यक्ती न नेमता सरकारी व्यक्ती नेमण्याचे आदेश दिले. कोरोनाचे संकट त्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे शासकीय कामे रेगाळण्याची शक्यता आहे. अशा दुहेरी संकटातून बाहेर पडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अष्टप्रधान मंडळाची गावांना गरज असल्याची भावना अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केली. गिरीश कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाचे मोठे आर्थिक संकट उभे राहिले असून, त्यापेक्षा अधिक भूकची समस्या जाणवत आहे. सर्वसामान्यांचे रोजगार बुडाले तर काहींच्या नोकर्‍या गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांपुढे उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये माणुसकी जीवंत ठेऊन एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. डॉक्टर कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत आहे. मात्र खाजगी दवाखान्यात दर निश्‍चित झाल्यास डॉक्टर व रुग्णांचे नाते चांगले राहणार आहे. सरकारी दवाखान्यात आजारापेक्षा तेथील असुविधेची अधिक चिंता नागरिकांना अधिक वाटते. यामध्ये सुधारणा आवश्यक आहे. पैसे अभावी कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये. हा नागरी हक्क त्यांना मिळाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच वेबीनारद्वारे नागरिकांना वाफ घेणे, पुरेश्या सुर्यप्रकाशात जाणे, शरीराला रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक व्हिटॅमीन सी, फिजीकल डिस्टन्स, मास्कचा वापर, आयुर्वेदिक काडा, पौष्टिक आहार व व्यायाम संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News