आरोग्य यत्रणेने कोरोना विषयी राबवलेल्या धोरणांमुळे ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात येत आहे!!


आरोग्य यत्रणेने कोरोना विषयी राबवलेल्या धोरणांमुळे ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात येत आहे!!

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी--दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात जुलै महिन्यात कोरोना ने  हाहाकार केला होता, परंतू दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन ग्रामीण भागात वाढत चाललेल्या कोरोना वर मात करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली,आणि ग्रामीण भागातील छोट्या छोट्या गावात आरोग्य कर्मचारी, आशा सेविका,अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत जनजागृती करून त्यांची माहिती घेत त्यांच्यावर योग्य ते उपचार करून ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आणला आहे, 31तारखेच्या रिपोर्ट मधील सर्व 26 व्यक्ती निगेटिव्ह आले होते,1 ऑगस्ट रोजी 62 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी फक्त गलांडवडी येथील एक 60 वर्षीय   व्यक्ती चा अहवाल पोझीती टिव आला असून बाकी 61व्यक्ती निगेटिव्ह आल्या असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. ग्रामीण भागात कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे ही आनंदाची बाब आहे, परंतू जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये,प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ अशोक राजगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News