धारणगाव येथे दुध दरवाढीबाबत दुधउत्पादकांचे आंदोलन !!


धारणगाव येथे दुध दरवाढीबाबत दुधउत्पादकांचे आंदोलन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

धारणगाव -राज्य सरकारने शेतकऱ्यांना दूध दरवाढीचे केवळ आश्वासन दिले आहे. त्यानंतर शासनाने ठोस असे काहीच शेतकऱ्यांच्या पदरात टाकले नाही.तरी दूधाला योग्य दर मिळावा यासाठी 1ऑगस्ट2020 रोजी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हेव भारतीय जनता पार्टी कोपरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धारणगावचे माजी उप सरपंच दिपक चौधरी नेतृवाखाली दुध उत्पादक शेतकरी व भारतीय जनता पार्टी च्या वतीने दूध दरवाढीबाबत सोशल डिस्टिंग शनचे पालन करीत दुध दरवाढ करण्याबाबत आघाडी सरकार विरोधात तिव्र महा-एल्गार

आंदोलन केले.आहे .

मागील चार महीन्यापासुन कोरोना महामारीमुळे अत्यंत अडचणीत आलेला शेतकरी फक्त दुग्ध व्यवसायावर आपली उपजिवीका करत आहे.आघाडी सरकार सत्तेवर येण्यापुर्वी राज्यात दुधाला ३०ते ३२ रूपये भाव मिळत असे परंतु आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी जाणुन बुजुन शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव कमी केले आणी दुधसंघाचे भाव मात्र जैसे थे आहेत.याचा निषेध म्हणून दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे तरी वर्तमान सरकारने दुधाला तीस रुपये हमी भाव द्यावा तसे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर दहा रुपये अनुदान जमा करावे अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला 50 रुपये अनुदान द्यावे 8.5.SNf व 3.5 Fat असलेल्या दुधाला पूर्वी 30 पैसे डिडक्शन होते ते आज एक रुपया केल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे ते ताबडतोब 30 पैसे  करावे तरी आघाडी सरकारने या सर्व मागण्या ताबडतोब मान्य कराव्या.असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

यावेळी माजी सरपंच दिपक चौधरी आनंदराव वहाडणे नानासाहेब थोरात अरुण वहाडणे संदिप थोरात दिलीपराव जाधव संपतराव वहाडणे इंद्रभान चौधरी नवनाथ चौधरी अजीत चौधरी अशोक चौधरी अशोक सुरे    विलास चौधरी योगेश कदम आबा   नरोडे बाळासाहेब सपकाळ भागीले आदिसह अनेक दुध उत्पादक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News