कुंभारी येथे आघाडी सरकार विरोधात तिव्र महा- एल्गार आंदोलन !!


कुंभारी येथे आघाडी सरकार विरोधात तिव्र महा- एल्गार आंदोलन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

भारतीय जनतापार्टी कोपरगाव तसेच भाजपाचा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कुंभारी येथील राघवेश्वर दुधसंकलन केंद्रावर संजीवनी पतसंस्थेचे संचालक व कुंभारी गावचे माजी सरपंच विजय कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख प्रमोद चिने,माजी उपसरपंच सोपान चिने,सुनिल कदम उत्तम कदम,राहुल कबाडी,भगवान खळे कचेश्वर माळी,शब्बीर शेख आदी कार्यकर्त्यानी सोशल डिसिंग शनचे पालन करीत दुध दरवाढ करण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात तिव्र महा- एल्गार आंदोलन केले.

मागील चार महीन्यापासुन कोरोना महामारीमुळे अत्यंत अडचणीत आलेला शेतकरी फक्त दुग्ध व्यवसायावर आपली उपजिवीका करत आहे.आघाडी सरकार सत्तेवर येण्यापुर्वी राज्यात दुधाला ३०ते ३२ रूपये भाव मिळत असे परंतु आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी जाणुन बुजुन शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव कमी केले आणी दुधसंघाचे भाव मात्र जैसे थे आहेत.याचा निषेध म्हणून दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे तरी वर्तमान सरकारने दुधाला तीस रुपये हमी भाव द्यावा तसे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर दहा रुपये अनुदान जमा करावे.

 अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला 50 रुपये अनुदान द्यावे 8.5.SNf व 3.5 Fat असलेल्या दुधाला पूर्वी 30 पैसे डिडक्शन होते ते आज एक रुपया केल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे ते ताबडतोब 30 पैसे  करावे तरी आघाडी सरकारने या सर्व मागण्या ताबडतोब मान्य कराव्या. 

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दूध दरवाढीचे केवळ आश्वासन दिले आहे. त्यानंतर शासनाने ठोस असे काहीच शेतकऱ्यांच्या पदरात टाकले नाही.तरी दूधाला योग्य दर मिळावा यासाठी 1 ऑगस्ट2020 रोजी दुध उत्पादक शेतकरी व भारतीय जनता पार्टी च्या वतीने दूध दरवाढीबाबत आंदोलन केले जात असल्याचे भारतीय जनता पार्टी व दुधउत्पादकांनी सांगीतले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News