संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव -भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शरद खरात यांचे मोठे बंधु चंद्रकांत खरात हे अहमदनगर येथील महानगरपालीकेत मुख्य लेखापरीक्षक या पदावर आपली सेवा देत होते.दि.३१ जुलै रोजी ते सेवानिवृत झाले असुन कोरोना महामारीचा पाश्र्वभुमीवर त्यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने शरद खरात यांच्या संकल्पनेतुन कोपरगाव शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविन्यात आले.
चंद्रकांत खरात यांनी आपल्या ३० वर्षाच्या काळात अहमदनगर, धुळे, जळगाव,नाशिक अश्या ठिकाणी शासकिय सेवा बजावली असुन आपल्या कार्यकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन दिन दुबळ्या गरीब जनतेची सेवा केली आहे. मितभाषी असलेले चंद्रकांत खरात यांनी या सेवा काळात निपक्ष तसेच प्रामाणिकपणे आपले काम केले असल्याने एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन त्यांचा नावलौकीक असुन दि.३१ जुलै रोजी ते सेवा निवृत्त होत आहे. त्यांच्या सेनानिवृत्तीचा निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ( खुले नाट्यगृह )येथे एका छोटेखानी कार्यक्रमात नगरपरीषदेच्या १५० महीला व पुरुष सफाई कामगारांना शिल्डमास्क व हँडग्लोजचे वाटप डॉं.अजय गर्जे तसेच सत्कारमुर्ती चंद्रकांत खरात यांचा हस्ते करण्यात आले असुन उद्या दि.२जुलै रोजी कोपरगाव पोलीस ठाण्यातील कोरोना योद्धांना शिल्डमास्क व हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात येणार असल्याची माहीती भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी दिली आहे.
याप्रसंगी पत्रकार सिद्धार्थ मेहरखांब पत्रकार मनिष जाधव, पत्रकार संजय भारती,प्रत्रकार मधुकर वक्ते पत्रकार रविंद्र जगताप आदि पत्रकार बंधुनी चंद्रकांत खरात यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त निसार शेख, शंकर घोडेराव, अनिल बनसोडे,सतिश गुंजाळ, गणेश रणशुर, मच्छिंद्र पाईक, सुरेश त्रिभुवन, तसेच खरात परीवारा सह कोपरगाव नगरपरीषदेचे ठेकेदार अरुण पाजणे, राजु उमाप, भूषण वडांगळे, तसेच भारिप बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी हजर राहुन चंद्रकांत खरात यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र साबळे तर आभार प्रदर्शन शरद खरात यांनी केले.