वाढदिवसाचा खर्च टाळून अमोलराजे इंगळे यांनी केले वृक्षारोपण.....


वाढदिवसाचा खर्च टाळून अमोलराजे इंगळे यांनी केले वृक्षारोपण.....

इंदापूर (प्रतिनिधी)काकासाहेब मांढरे: आज इंदापुर तालुक्यातील बाभुळगाव येथे युवा नेते अमोलराजे इंगळे यांनी स्वताच्या मुलीच्या वाढदिवसा अनावश्यक खर्च टाळून शेकडो वृक्षाचे वृक्ष रोपण राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते केले. या वेळी मा.हर्षवर्धन पाटील म्हणाले की स्नेहा अमोलराजे इंगळे हिला उत्तम आरोग्य व दिर्घ आयुष्य लाभो. तसेच हे समाजाच्या हिताचे सामाजीक काम आहे. इंदापुर तालुक्यात काही लोकांना कोरोना या महामारीचे गांभीर्याने नाही.तरिही आज या ठिकाणी 300 च्या वरती वृक्ष रोपण केले जात आहे.असे पाटील म्हणाले   या वेळी  ॠतुजा (ताई) पाटील,मालोजी पाटील,राजाभाऊ इंगळे, राम आसबे,प्रितमकुमार देवकर,  भगवान मोरे(सर),भास्कर गुरगुडे, बाभुळगाव ग्रामस्थ,युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News