वाळकी परिसरातील येणारे मळा रस्त्यांची दुरवस्था


वाळकी परिसरातील येणारे मळा रस्त्यांची दुरवस्था

वाळकी विजय भालसिंग ( प्रतिनिधी ) नगर तालुक्यांतील वाळकी परिसरातील येणारे मळा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे . रस्त्यात जागो जागी असंख्य खड्डे पडल्यामुळे खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे समजत नाही . वाळकी गाव ते येणारे मळा हा रस्ता गाडी रस्ता व पायवाट हया प्रमाणे आहे . हे अंतर गावापासून मळ्यापर्यत साधारण २ कि.मी. आहे .मध्यतरी या खराब रस्ता बाबत वाचा फोडून या रस्त्याचे डांबरीकरण काम झाले असून ते पण अर्धवट झाले . या रस्त्यांची दुरवस्थाला खरी सुरवात होते . ती वाळकी गावचे ग्रामदैवत श्री . भैरवनाथ मंदीराच्या पंटागणातून जागो जागी अंसख्य खंड्यानी सुरवात होते . खरी कसरत दुधवाले आपले वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन गाडी चालवत असून दळण वळणाच्या दुष्टीकोनातून हे गैर सोयीचे असून पावसाळ्यांत मळा व गाव यातील संपर्क बऱ्यांच वेळा तुटतो . दुचाकी व चारचाकी वाहने जात नसल्यामुळे शेतीमाळ वेळेत मार्केटला वेळीच पोहचत नाही . पर्यायी शेतकऱ्याचे खराब रस्त्यामुळे आर्थिक नुकसान होते . आजार पणाचा विचार करता सिरेस पेंशट खराब रस्त्यामुळे  नेतांना तारेवरची कसरत करावी लागते .या वस्ती वरचे लोक एक प्रकारे नरकयातना भोगत असून वाळकी परिसरातील सर्व वाड्या वस्तावर डांबरीकरण झालेले आहे . एक मेव हाच रस्ता अधर्वट राहीलेला असून पावसळ्यांत दुचाकी मोटार सायकलच्या अनेक वेळा अपघात झालेले आहे . हया वस्तीची लोकसंख्या ८00 ते ९०० पर्यन्त आहे .निवडूण दिलेल्या लोकप्रतिनिधीनी या खराब रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा अशी नागरिकांची महिला भगिणीची सततची मागणी आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News