एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ठिबकचे ७० लाख रुपये अनुदान मंजूर !! लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम-आ.आशुतोष काळे.


एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ठिबकचे ७० लाख रुपये अनुदान मंजूर !! लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम-आ.आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना मागील २०१९/२० या वर्षाचे ठिबक सिंचन अनुदान मिळावे यासाठी शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ७० लाख रुपये ठिबक सिंचन अनुदान मंजूर केले असून हि रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की,पाण्याची बचत होवून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात करावा यासाठी शासनाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या भरवशावर २०१९/२० मध्ये असंख्य शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संच खरेदी केले होते.ठिबक सिंचन संचासाठी प्रतिकूल परिस्थितीत मोठी गुंतवणूक करून शेतकरी अडचणीत आल्यामुळे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. ठिबकचे अनुदान तातडीने मिळावे याबाबत पाठपुरावा करावा असे साकडे शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांना घातले होते.त्याबाबत राज्याचे कृषीमंत्री नामदार दादा भुसे, नामदार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हा नियोजन बैठकीत लक्ष वेधून त्याबाबत पाठपुरावा केला होता.तसेच मागील महिन्यात कृषी आयुक्त यांच्याशी देखील याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. त्या पाठपुराव्यातून जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ४३.९० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात येवून हि अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यापूर्वीच जमा झालेली आहे.उर्वरित शेतकऱ्यांचे देखील ठिबक सिंचन अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरूच होता.त्या पाठपुराव्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देतांना सुक्ष्म सिंचन योजना अंतर्गत २०१९-२०च्या ठिबक सिंचन अनुदानापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात नव्याने ७० लाख रुपये अनुदान जमा केले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्याला आजपर्यंत चौकट-   एक कोटी चोवीस लाख रुपये एकाच महिन्यात ठिबक सिंचन अनुदानापोटी मिळाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर ठिबक सिंचन योजनेचे अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरूच असून त्याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले आहे.

 सध्या संपूर्ण विश्वावर कोरोना व्हायरसचे वैश्विक संकट आहे.या संकटात तीन महिने लॉकडाऊन असल्यामुळे आर्थिक चाके रुतली असतांना महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांना एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ठीबक सिंचनचे अनुदान देवून खरीप हंगामात योग्य वेळी सहकार्य करून मोलाची मदत केल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News