रुद्र अपंग संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी दिपाली पडोळे


रुद्र अपंग संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी दिपाली पडोळे

 नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) महाराष्ट्र राज्यात दिव्यांग बंधू-भगिणीचे असणारे प्रश्‍न प्राधान्याने सोडवण्यासाठी अग्रेसर असणार्‍या रुद्र अपंग संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी सौ.दिपाली विजय पडोळे यांची निवड करण्यात आली. ही निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष व्यास, प्रदेशाध्यक्ष बालाप्रसाद आग्रवाल, नाशिक विभागीय सचिव  श्रीमती सोनवणे यांच्या सूचनेने जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे व महिला जिल्हाध्यक्षा आशाताई गायकवाड यांनी केली.

             सौ.दिपाली विजय पडोळे यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून दिव्यांच्या प्रश्‍नांना नेहमीच वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच होतकरु व दिव्यांगांना स्व:खर्चाने धान्य, किरणा, वस्तू स्वरुपात वाटप करुन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर बोलतांना सौ.दिपाली पडोळे म्हणाल्या, रुद्र अपंग संघटनेने आपल्यावर टाकलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडू. दिव्यांग, महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात आवाज उठवू व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार व सर्वांना बरोबर घेऊन काम करु, असे सांगितले. सौ.दिपाली पडोळे यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News