लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी आणि अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त या महामानवांना शहर काँग्रेसतर्फे अभिवादन


लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी आणि अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त या महामानवांना शहर काँग्रेसतर्फे अभिवादन

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) लोकमान्य टिळक यांची आज 100 वी पुण्यतिथी. आजपासून त्यांची स्मृती शताब्दी वर्ष सुरु होत आहे तर अण्णाभाऊ साठे यांची आज 100 वी जयंती. आजपासून साठे यांची जयंती शताब्दी वर्ष सुरु होत आहे. या निमित्ताने अहमदनगर शहर व भिंगार काँग्रेस कमिटीच्यावतीने लालटाकी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले. तर इमारत कंपनी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला ॲड.आर.आर.पिल्ले यांनी पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले. 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे नेतृत्व करुन इंग्रजांना सळो की पळो केले तसे त्याकाळी समाज सुधारणेकडेही त्यांनी लक्ष दिले होते. पुरोगामी विचारांचे आणि स्वातंत्र्य, समता, बंधूत्व या विचाराने टिळक भारावलेले होते. पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांनी पोलादी ब्रिटीश सरकारला धारेवर धरले होते. टिळकांनंतरही काँग्रेसची मजबूत फळी स्वातंत्र्य लढात आणि समाज सुधारणेत अग्रेसर होती, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहीरीतून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु ठेवली. डाव्या

जाहिरात
Search
विडिओ
Recent News