निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने नाना डोंगरे यांना पर्यावरण संरक्षक पुरस्कार


निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने नाना डोंगरे यांना पर्यावरण संरक्षक पुरस्कार

निमगाव वाघाच्या भूमिपुत्रास  निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने नाना डोंगरे यांना पर्यावरण संरक्षक पुरस्कार पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचा सन्मान 

वाळकी विजय भालसिंग ( प्रतिनिधी ) निमगाव वाघा ( ता.नगर ) येथील सामार्जिक कार्यकते पै . नाना डोंगरे यांच्या पर्यावरण संबर्धनाच्या कार्याची दखल घेत निसर्ग व सामाजिक पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची दखल घेत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने त्यांना श्री . संत तुकाराम महाराज पर्यावरण संरक्षक पुरस्कार देण्यांत आला .मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी डोंगरे यांना सन्मान पत्र प्रदान करून गौरविले . पै. नाना डोंगरे यांचे मागील दहा वर्षोपासून स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य चालू आहे .ते नुकतेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाशी जोडले गेले असून त्यांना जिल्हा कार्याध्यक्ष व राज्यप्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यांत आली आहे . ग्रामिण भागात विशेष करून आपल्या जन्मभूमी निमगाव वाघा या भूमित वृक्षरोपन , बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे . त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी सांगितले . नाना डोंगरे यांनी श्री. संत तुकाराम महाराजांच्या नावाने मिळालेला पर्यावरण संरक्षक पुरस्कार माझ्या सारख्या साध्या वारकरी माणसाला मिळाल्याचे यांच्या पेक्षा दुसरा कोणताच आंनद नाही . सदरचा मिळालेला पुरस्कार महत्वाचा असून या पुरस्काराने आनखी कार्य करण्यास बळ व प्रेरणा मिळणार आहे .या पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे . पर्यावरण संवर्धन व प्रदूषणमुक्तीसाठी भरीव उपक्रम राबवून आता मोठ्या प्रमाणात युवकांना या चळवळीत सहभागी करून घेणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली . अशा या निसर्गप्रेमी माणसाला सदरचा पुरस्कार मिळाल्याने निमगांव वाघा पंचकोषीतून या सामान्य व्यक्तीचे सर्व स्तरामधून कौतुकाची शांबासकी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News